आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत यंदा पाणी कमी तुंबलं, मुंबई महापौरांनंतर उद्धव ठाकरेंचा दावा, Uddhav Thackerey Claims About Waterlogging In Mumbai

गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत यंदा पाणी कमी तुंबलं, मुंबई महापौरांनंतर उद्धव ठाकरेंचा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शहरात रविवार रात्रीपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक रस्‍ते पाण्‍याखाली गेलेले असतानाही शहरात पाणी तुंबलंच नाही, असा दावा मुंबई महापौरांनी केल्‍यानंतर उद्धव ठाकरेंनीही गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत यंदा पाणी कमी तुंबलं, असे म्‍हटले आहे. तसेच मुंबईचा भूभाग समुद्रसपाटीपासून खाली असल्‍यामुळे काही वेळ पाणी साचतं, अस स्‍पष्‍टीकरणही त्‍यांनी दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी आज (सोमवारी) महापालिकेच्‍या मुख्‍यालयात जाऊन आपत्‍कालीन विभागासोबत चर्चा केली. यावेळी ते बोलत होते. 


यंदा पाणी तुंबलंच नाही,  मुंबई महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांचा दावा
उद्धव ठाकरे यांच्‍या दाव्‍यापूर्वी आज सकाळी मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी शहरात कुठेच पाणी तुंबलं नाही, असा अजब दावा केला होता. मात्र याचदरम्‍यान धो-धो पावसामुळे शहरातील अनेक रस्‍ते पाण्‍याखाली गेल्‍याचे दिसत होते. महाडेश्‍वर म्‍हणाले होते की, 'पहाटेपासून धुवाधार पाऊस पडतोय. मी सकाळपासून मुंबईत फिरतोय पण मला कुठेही पाणी तुंबलेले दिसले नाही.' वडाळ्यातल्या अँटॉप हिल परिसरातील दोस्ती नावाच्या इमारतीच्या बाहेरील भाग खचला आहे. याविषयी विचारले असता, ते म्हणाले, 'काही ठिकाणी पाणी साचलेले होते. काही ठिकाणी दुर्घटनाही घडल्‍या. मात्र सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही, हे सुदैव.' 


पुढील स्‍लाइडवर वाचा, 'करून दाखवलं' म्हणणाऱ्यांनी 'पळून दाखवलं'; आशिष शेलारांचा टोला...  

 

बातम्या आणखी आहेत...