आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरे यांनी नाकारली केंद्रीय मंत्री प्रधानांना भेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- नाणार प्रकल्पासाठी विदेशी कंपन्यांशी सरकार करार करत असतानाच शिवसेनेने विरोध केल्याने हा प्रकल्प अडचणीत आला आहे. शिवसेनेची समजूत काढण्यासाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट मागितली होती. मात्र, ठाकरे यांनी भेट नाकारल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत धर्मेंद्र प्रधान यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही. मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी उद्योगमंत्री सुभाष देसाईंसोबत या विषयावर बैठक आयोजित केली आहे. 


रत्नागिरी जिल्ह्यात केंद्र सरकार नाणार रिफायनरी प्रकल्प सुरू करत आहे. नवी दिल्लीत सोमवारी यावर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्पाबाबत अबुधाबी आणि केंद्र सरकारमध्ये गुंतवणूक करार झाला आहे. या कराराला थांबवण्याऐवजी गती देण्याचे काम केंद्राकडून जोरात सुरू आहे. शिवसेनेचा विरोध पाहून केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांची या विषयावर चर्चा करण्यासाठी वेळ मागितली होती. मात्र, करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर भेट कशाला, असे म्हणत ठाकरे यांनी भेट नाकारल्याचे समजते. 

बातम्या आणखी आहेत...