आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचे संकट, दोन दिवसांत विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यात काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसामुळे शेतमाल व पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. आत पुन्हा अवकाळी पावसाचे संकट राज्यावर ओढावणार आहे. हवामान खात्याने येता पाच दिवसांत राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस बरसण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. 

 

हवामान खात्याने विशेषकरुन मराठवाडा आणि विदर्भातील शेतक-यांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. येत्या दोन दिवसांत विदर्भात सोसाटयाच्या वा-यासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले होते मराठवाड्यातील लातूर उस्मानाबाद, तर नाशिक, पुणे, सातारा, तसेच विदर्भात गारपीटीने ने पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. यवतमाळमध्ये वीज पडून पाच जणांचा तर लातूरमध्ये एक जणाचा मृत्यू झाला होता. 

 

बातम्या आणखी आहेत...