आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाऊदच्या साम्राज्याला घरघर: छोटा शकीलची वेगळी चूल, आता हत्या होण्याची भीती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका मिटिंग दरम्यान दाऊद आणि शकील यांच्यात वाद झाला आणि त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. - Divya Marathi
एका मिटिंग दरम्यान दाऊद आणि शकील यांच्यात वाद झाला आणि त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

मुंबई- ज्या छोटा शकीलच्या जीवावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने आपले काळे साम्राज्य उभे केले, तोच आता वेगळा झाला आहे. हे म्हणणे आहे इंटलिजन्स एजन्सीज आणि मुंबई पोलिसांचे. मुंबई पोलिसांतील एका अधिका-यांच्या माहितीनुसार, 'डी' कंपनीचे आता दोन तुकडे झाले आहेत. अंडरवर्ल्ड डॉनची सर्व रहस्ये छोटा शकीलला माहित आहेत त्यामुळे वेगळे झाल्याने आपली हत्या होऊ शकते अशी भीती त्याला वाटत होती. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवायचे झाल्यास, अनीश इब्राहिम याच्यामुळे दाऊद आणि छोटा शकील यांच्यात गेली अनेक वर्षे वादविवाद सुरू होते. याचा शेवट अखेर आता त्यांच्या वेगळे होण्यात झाली आहे. यामुळे वेगळे झाले दाऊद आणि शकील...

 

- पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई सोडल्यानंतर छोटा शकील दाऊदजवळच कराचीतील रेडक्लिफ एरियात राहत होता. आता त्याने आपले ठिकाण बदलले आहे आणि तो कुठे आहे याची कोणालाही माहिती नाही.
- अंदाजे 50 वर्षाचा शकील आणि दाऊद यांच्यात त्याचा छोटा भाऊ अनीसचा गॅंगच्या कारभारात ढवळाढवळ होत असल्याने वाद सुरू होता. आता या वादामुळेच शकिल दाऊदपासून वेगळा झाल्याचे समोर येत आहे. 
- अनीस सुद्धा दाऊदसोबत पाकिस्तानात राहतो. यापूर्वी त्याने अनेकदा गॅंगमध्ये काम करताना दाऊदच्या जवळ जाण्याच्या नादात आणि शकीलला साईडलाईनला करण्याचा प्रयत्न केला होता.

 

दाऊदने दूर राहण्यास सांगितले- 

 

- पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, अनिसच्या मुद्यांवरून वाद झाल्यानंतर दाऊदने छोटा शकीलला त्याच्या बिजनेसपासून दूर राहण्यास आणि त्याच्या लोकांशी संपर्कात न राहण्यास सांगितले आहे. दाऊदने दुबईतील आपल्या लोकांनाही याची मागिती दिली आहे.  चर्चा ही सुद्धा आहे की, शकीलने सुद्धा एका ईस्टर्न आशियाई देशातील आपल्या खास हस्तकांसमवेत मिटिंग केली आहे. 
- दाऊद आणि शकील यांच्यातील मतभेद विकोपाला गेल्यानंतर पाकिस्तानातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. सांगितले जात आहे की, जर गॅंग तुटली तर भारताविरोधात होणा-या कारवायांत अडथळा येईल. 
- 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटात दाऊदचा हात होता आणि शकील सुद्धा हे स्फोट घडवून आणणा-यात मुख्य आरोपी आहे.

 

कोण आहे छोटा शकील?

 

- छोटा शकीलचे खरं नाव शकील बाबूमियां शेख आहे. मुंबईत जन्मलेल्या शकीलचे पिता मोईनुद्दीन शेख आणि आई शुब्रा बी होती. 
- उपलब्ध माहितीनुसार, सध्या शकील कराचीतील डिफेन्स एरियात राहतो.
- शकीलवर1993 मधील मुंबई बॉम्बस्फोट, हवाला, खंडणी, अपहरण, शस्त्रास्त्र व स्फोटकांची तस्करी, बॉलिवूड फिल्ममध्ये ब्लॅक मनी गुंतवणे आणि देशविरोधी कारवायांतं भाग घेणे आदी आरोप आहेत. 
- मुंबई पोलिस आणि सीबीआय गेली अनेक वर्षे छोटा शकीलचा शोध घेत आहेत. त्याचे नाव देशातील टॉप मोस्ट वॉन्टेड गु्न्हेगारांच्या यादीत सामील आहे.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित माहिती....

बातम्या आणखी आहेत...