आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्याला येत्या 2 दिवसांत मुसळधार पावसासह गारपीटीचा धोका, हवामान विभागाचा अंदाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यातील अनेक भागांत येत्या दोन दिवसांत गारपीट आणि मुसळधार अवकाळी पावसाचा धोका आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, तर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई हवामान विभागाने हा अंदाज वर्तवला  आहे.

 

साता-यातील पाटणमध्ये जोरदार पाऊस पडला. तसेच शनिवारी मनमाड, सांगली, सोलापूर, पुण्यातील जुन्नर येथे गारपीट झाली. मनमाडमध्ये वादळीवाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने शेतकरी आणि व्यापाऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. मनमाडमध्ये पावसामुळे कांदा व्यापाऱ्यांचे शेड कोसळले आहे, तसंच सांगलीतील जत तालुक्यात एका शेतकऱ्याचं अंदाजे 23 लाखाचं नुकसान झालं आहे. शुक्रवारी लातूरमधील निलंगा आणि उदगीरमध्ये ही गारपीट झाली होती. यातदेखील शेतमालाचे नुकसान झाले आहे. 

बातम्या आणखी आहेत...