आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसई-विरार महापालिकेच्या आयुक्तांना अटक, बिल्डरला मागितली होती 25 लाखांची खंडणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वसई- वसई विरार महापालिकेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव यांना 25 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी शनिवारी दुपारी अटक केली. जाधव यांनी एका बिल्डरला खंडणी मागितली होती त्याने याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली होती.


एका व्यक्तीने 2016 मध्ये बिल्डर धर्मेश गांधी यांच्याविरोधात अवैध बांधकामासंदर्भात सहायक आयुक्त प्रेमसिंग जाधव यांच्याकडे  तक्रार केली होती. त्यावेळी बांधकामावर कारवाई न करण्याच्या बदल्याजाधव यांनी या बिल्डर गांधीकडे  25 लाखाची खंडणी मागितली होती. त्यातील पाच लाखाची रक्कम प्रेमसिंग यांनी कार्यालयातच स्वीकारली होती. याप्रकरणी गांधी यांच्या तक्रारीवरुन, प्रेमसिंग जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात  दोन अनोळखी इसम देखील आहेत. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणी याला अटक करण्यात आली आहे. आज त्याला वसई न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. वसई-विरार क्षेत्रात खंडणीच्या गुन्ह्यांचे सत्र सुरुच आहे. 31 मार्चपासून आतापर्यंत विविध पोलीस ठाण्यात 19 गुन्हे दाखल झाले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...