आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी पंतप्रधान इंदिरा गांधींवर बायोपिक, अभिनेत्री विद्या बालन साकारणार भूमिका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदिरा गांधी यांची भूमिका दर्जेदार अभिनेत्री विद्या बालन साकारणार आहे. - Divya Marathi
इंदिरा गांधी यांची भूमिका दर्जेदार अभिनेत्री विद्या बालन साकारणार आहे.

मुंबई- लेखिका सागरिका घोष यांच्या 'इंदिरा : इंडियाज मोस्ट पॉवरफुल प्राईम मिनिस्टर' या पुस्तकावर आधारित चित्रपटात अभिनेत्री विद्या बालन ही माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत झळकणार आहे. चित्रपट निर्मितीच्या उद्देशाने या पुस्तकाचे अधिकार विकत घेतल्याची माहिती विद्या बालननेच स्पष्ट केली. मात्र, या कथानकावर चित्रपट बनवायचे की वेब सीरिज हे अद्याप निश्चित नसल्याचेही तिने सांगितले.

 

दरम्यान, आपल्या पुस्तकावर आधारित इंदिरा गांधींना पडद्यावर पाहण्यास उत्सुक असल्याचे सागरिका घोष यांनी म्हटले. 39 वर्षीय विद्याने 'तुम्हारी सुलू' या चित्रपटात शेवटची भूमिका साकारली होती.

 

आपल्याला माहित असेलच की, नोव्हेंबर महिन्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावरील बायोपिक चित्रपटाची घोषणा करण्यात आली. संजय राऊत निर्मित व अभिजीत पानसे दिग्दर्शित ठाकरे हा चित्रपट 23 जानेवारी 2019 रोजी रिलीज केला जाणार आहे. 


भारतरत्न, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर चित्रपट येत आहे. युगपुरूष अटल असे या चित्रपटाचे नाव असून, पुढील वर्षी 25 डिसेंबर रोजी अटलजींच्या वाढदिवशीच तो रिलीज करण्याचा चित्रपट निर्मात्याचा मानस आहे. या चित्रपटाद्वारे अटलजींचे राजकीय, सामाजिक आणि साहित्यिक प्रवास उलगडणार आहे.

 

मागील महिन्यात 25 डिसेंबर रोजी अटलबिहारी वाजपेयी यांचा 93 वा वाढदिवस साजरा झाला. हाच मुहूर्त साधत त्यांच्या आयुष्यावरील चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. याद्वारे अटलजींच्या आजवरच्या प्रवासावर प्रकाशझोत टाकला जाणार आहे. अटलजींच्या कविता त्यांच्या संवेदनशील व्यक्तीचे दर्शन घडवितात. त्यामुळे त्यांच्या या चित्रपटात त्याच्याच कविता गाणी म्हणून सादर केली जाणार आहेत.

 

स्पेक्ट्रम मूव्हीजने या चित्रपटाची घोषणा केली आहे तर, रणजित शर्मा हे त्याचे निर्माते असतील. मयांक श्रीवास्तव हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करतील. बप्पी दा लाहिरी यांचे संगीत आहे. मात्र, या चित्रपटात अटलजींची भूमिका कोण साकारणार हे अद्याप ठरलेले नाही. अटलजींवरील चित्रपट 25 डिसेंबर 2018 रोजीच प्रदर्शित होईल. 

 

पुढे स्लाईडद्वारे वाचा व पाहा, बाळासाहेब, अटलजी व इंदिरा यांच्यातील दुवा....

बातम्या आणखी आहेत...