आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'विनोद कांबळी क्रिकेट अकादमी\'चे कणकवलीत उद्घाटन, नितेश राणे- कांबळीची उपस्थिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजी क्रिकेटर विनोद कांबळीच्या हस्ते या अकादमीचे लोकार्पण करण्यात आले. - Divya Marathi
माजी क्रिकेटर विनोद कांबळीच्या हस्ते या अकादमीचे लोकार्पण करण्यात आले.

कणकवली- आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून साकारलेली विनोद कांबळी सिंधुदुर्ग ग्रामीण क्रिकेट अकादमीचे आज उद्घाटन झाले. माजी क्रिकेटर विनोद कांबळीच्या हस्ते या अकादमीचे लोकार्पण करण्यात आले. कणकवली तालुक्यातील कलमट येथे चार एकरात ही अद्यावत अकादमी उभारण्यात आली आहे. येथील खेळपट्टी आणि मैदान पीच क्यूरेटर नदीम मेमन यांच्या देखरेखीखाली तयार करण्यात आले आहे.

 

यावेळी बोलताना विनोद कांबळी म्हणाला की, मला कोकणासारख्या ग्रामीण भागातील मुलांना क्रिकेटचे प्रशिक्षण द्यायला नक्कीच आवडेल. यासोबतच मी वेगवेगळ्या क्रिकेटर्सना येथे आणणार आहे. माजी क्रिकेटर व भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि माजी कर्णधार कपिल देव, सुनील गावसकर आदी बड्या खेळाडूंना मी येथे आणेन असा शब्द विनोदने यावेळी उपस्थितांना दिला. 

कोकणासारख्या मागास भागातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटर तयार व्हावेत या उद्देशाने माजी क्रिकेटर विनोद कांबळी क्रिकेट अॅ्कॅडमीची स्थापना केल्याचे आमदार नितेश राणेंनी सांगितले. विनोद कांबळी येथील मुलांना प्रशिक्षण देणार असल्याने येथून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होतील असेही राणेंनी विश्वास व्यक्त केला. 

 

मुलांसोबत मुलींनाही प्रशिक्षण-

 

- या अॅकॅडमीत सर्व मुले-मुली सहभागी होऊ शकतात. महिन्यातून पाच वेळा स्वत: विनोद कांबळी प्रशिक्षण देण्यासाठी कणकवलीत येणार आहे. 
- बॉलिंग, फिल्डींग, बॅटिंग, विकेटकीपर या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशिक्षणासाठीही क्रीडा क्षेत्रातील आणखी काही तज्ज्ञ प्रशिक्षक आणले जाणार आहेत. 
- वैभववाडीच्या पुनम राऊत हिने महिला क्रिकेट स्पर्धेत दाखवलेली चमक आणि केलेली कामगिरी लक्षात घेता या अॅकॅडमीत मुलींनाही प्राधान्य दिले जाईल, असे नितेश राणेंनी सांगितले आहे.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, विनोद कांबळी क्रिकेट अॅकॅडमीच्या उद्घाटनाचे फोटोज....

बातम्या आणखी आहेत...