आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम यांनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पलूस- कडेगाव (जि. सांगली) विधानसभा मतदारसंघात झालेल्या पाेटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार  विश्वजित पतंगराव कदम हे बिनविरोध निवडून आले आहेत. बुधवारी विधानमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी त्यांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिली. 

 

व्यासपीठावर विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, विधानमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे उपस्थित होते. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार अशोक चव्हाण,  अामदार शरद रणपिसे, मोहनराव कदम, जयंत पाटील, आनंदराव पाटील, हरिभाऊ राठोड,  अमरनाथ राजूरकर, हर्षवर्धन सपकाळ, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, सुनील तटकरे,  डी.पी.सावंत, डॉ. सतेज पाटील, गोपालदास अग्रवाल, सुनील केदार, प्रणिती शिंदे अादी उपस्थित हाेते.

 

बातम्या आणखी आहेत...