आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक, पदवीधरच्या 4 जागांसाठी 25 जूनला मतदान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -    विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील विद्यमान चार आमदारांचा कार्यकाळ ७ जुलै रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने या चार मतदारसंघांतील निवडणूक कार्यक्रम गुरुवारी जाहीर केला. त्यानुसार २५ जून रोजी मतदान असून २८ जून रोजी मतमोजणी होणार आहे.  


नाशिक शिक्षक मतदारसंघातील प्रा.   डाॅ. अपूर्व हिरे (अपक्ष), मुंबई शिक्षक मतदारसंघातील कपिल पाटील (जनता दल युनायटेड), मुंबई पदवीधर मतदारसंघातील विद्यमान अामदार, आरोग्य मंत्री दीपक सावंत (शिवसेना) आणि कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदारकीचा नुकताच राजीनामा दिलेले निरंजन डावखरे (राष्ट्रवादी काँग्रेस) या चार सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने ही निवडणूक जाहीर झाली आहे.  या चार जागांसाठी ७ जूनपर्यंत अर्ज  दाखल करता येतील. अर्ज मागे घेण्याचा ११ जून शेवटचा दिवस आहे. २५ जून रोजी मतदान होईल आणि २८ जून रोजी मतमोजणी होणार आहे.  निवडणूक आयोगाने या चार मतदारसंघांतील निवडणूक कार्यक्रम यापूर्वी जाहीर केला हाेता.

 

त्यानुसार ८ जून रोजी मतदान होणार होते. मात्र, उन्हाळी सुट्यांच्या काळात निवडणूक येत असल्यामुळे शिक्षकांची गैरसोय होऊ शकते, अशा तक्रारी आयोगाकडे आल्या होत्या. त्यामुळे आयोगाने नव्याने कार्यक्रम जाहीर केला आहे.  डावखरे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली अाहे. डाॅ. दीपक सावंत हे मंत्री असल्याने व कपिल पाटील पक्षाचे प्रमुख असल्याने त्यांना पुन्हा उमेदवारी मिळू शकते. डाॅ. अपूर्व हिरे मात्र या वेळी विधानसभेसाठी इच्छुक नाहीत.

बातम्या आणखी आहेत...