आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांवर अश्लील टिप्पणी केल्याने दोघांवर गुन्हा, एकाला अटक दुस-याचा शोध सुरु

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नीबद्दल अश्लील टिप्पणी केल्याने जुहू पोलिस ठाण्यात दोन जणाविरोधात गुन्हा दाखल केला असून यापैकी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. दुस-या फरार आरोपीचा शोध सुरु आहे. आरोपींनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियात पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्याबाबतीत अश्लील टिप्पणी केली होती. यानंतर एका तक्रारदाराने पोलिसांत तक्रार दिली होती. 

 

यासंदर्भात तक्रारदाराकडून आलेल्या तक्रारीनंतर जुहू पोलिसांनी 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. अश्लील शिवीगाळ करणे, ठार मारण्याची धमकी देणे, दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे वक्तव्य केल्या प्रकरणी आणि माहिती व तंत्रज्ञान कायदयाखाली दोघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी अनिकेत पाटील याला अटक केली असून दुसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. लवकरच दुसऱ्या आरोपीलाही अटक करण्यात येईल असा विश्वास जुहू पोलिसांनी यावेळी व्यक्त केला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...