आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Heavy Rain: ठाण्‍यात भिंत कोसळली; कुटुंबातील 1 जण ठार, 2 जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे- शहरातील पाटीलपाडा येथे सततच्‍या पावसामुळे एक भिंत कोसळून 1 ठार तर दोन जण जखमी झाले आहेत. सोमवारी मध्‍यरात्री साडेबाराच्‍या सुमारास ही घटना घडली.

 

यादरम्‍यान पावसामुळे कमकुवत झालेली 30 फुटांची संरक्षक भिंत पाटीलपाडा येथील एका घरावर कोसळली.  यात कुटुंबातील एक जणाचा मृत्‍यू तर दोन जण जखमी झाले.  प्रकाश वाळवे (35) असे मृत व्‍यक्‍तीचे नाव आहे. त्‍यांच्‍या पत्‍नी भारती वाळवे या जखमी झाल्‍या आहेत. तर समय जाधव (10) हा मुलगा जखमी झाला. सध्‍या त्‍याच्‍यावर उपचार सुरू आहेत.  

 

या दुर्घटनेत 5 घरांचे नुकसान झाले आहे. सर्वांना सुरक्षित ठिकाणी हलविण्‍यात आल्‍याची माहिती आहे. दुर्घटनेनंतर अग्निशमन दल आणि महापालिकेने धोकादायक भिंतीचा भाग हटवला आहे. 


पुढील स्‍लाइडवर पाहा फोटो.... 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...