आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा पुतळा कोणाचा, आहे माझा मेणाचा; सुनील कंडलूर यांनी बनवला रामदास आठवलेंचा मेणाचा पुतळा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेणाच्या पुतळ्याशेजारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रामदास आठवले. - Divya Marathi
मेणाच्या पुतळ्याशेजारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रामदास आठवले.

मुंबई - केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांच्या मेणाच्या पुतण्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडले. समाजाला योग्य दिशा देणारे नेतृत्व, असा मुख्यमंत्री यांनी आठवले यांचा गौरव केला. आठवले यांची केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदाची अपेक्षा लवकर पूर्ण होईल, असेही फडणवीस यांनी या वेळी सूचित केले. दरम्यान, या वेळी कविमनाच्या आठवले यांनी हा  पुतळा कोणाचा, आहे माझा मेणाचा अशा ओळीही ऐकवल्या.  

 

सुनील कंडलूर यांनी आठवले यांचा हा पुतळा बनवला आहे. हा पुतळा लोणावळा येथील सुनील मॅक्स म्युझियममध्ये जतन केला जाणार आहे. कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले की, पुतळा इतका हुबेहूब आहे की खरे आठवले कोणते, हे समजणे कठीण झाले अाहे. मात्र, जे कविता म्हणतील ते खरे आठवले असे मी समजेन, असे म्हणताच सभागृहात मोठा हशा पिकला. 


हा पुतळा कोणाचा, आहे माझा मेणाचा... या कवितांच्या ओळींनी रामदास आठवले यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. तसेच लवकरच मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे आपल्या हस्ते अनावरण होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पुतळा बनवणारे कंडलूर यांना नवी मुंबईत संग्रहालयासाठी जागा द्यावी तसेच त्यांची पद्मश्री किताबासाठी राज्य सरकारने त्यांची शिफारस करावी, अशा मागण्या त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवल्या. सह्याद्री अतिथिगृहावर झालेल्या या कार्यक्रमास आठवले यांच्या पत्नी सीमा, चिरंजीव जीत व मोठ्या संख्येने रिपाइं कार्यकर्ते उपस्थित हाेतेे. कंडलूर यांनी यापूर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ गायिका अाशा भोसले यांचे मेणाचे पुतळे बनवले आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...