Home | Maharashtra | Mumbai | Weather Forecast: 4 Day Heavy Rain Alert In 7 States

राज्‍यभरात पावसाची दडी, शेतक-यांची चिंता वाढली; देशात आतापर्यंत 7 टक्‍क्‍यांहून कमी पाऊस

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Jul 02, 2018, 08:04 PM IST

कोकण वगळता राज्‍यातील इतर भागामध्‍ये पावसाने दडी मारल्‍याने शेतक-यांमध्‍ये चिंतेच वातावरण पसरल आहे.

 • Weather Forecast: 4 Day Heavy Rain Alert In 7 States

  मुंबई- कोकण वगळता राज्‍यातील इतर भागामध्‍ये पावसाने दडी मारल्‍याने शेतक-यांमध्‍ये चिंतेच वातावरण पसरल आहे. बंगालच्‍या उपसागरामधील कमी दाबाचा पट्टा गायब झाल्‍याने ही स्थिती निर्माण झाल्‍याची माहिती हवामान विभागने दिली आहे. जूनच्‍या तिस-या आठवड्यात मध्‍य महाराष्‍ट्र, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाच्‍या सरी बरसल्‍या. त्‍यानंतर मात्र कुठेही चांगला पाऊस झाला नाही. काही ठिकाणी हलक्‍या सरी कोसळल्‍या. मात्र समाधानकारक पाऊस होऊ शकला नाही.

  येत्‍या 4 दिवसांत चांगल्‍या पावसाची शक्‍यता
  हवामान विभागाने येत्‍या 4 दिवसांत देशभरातील 7 राज्‍यांत जोरदार पाऊस तर 18 राज्‍यांत चांगल्‍या पावसाचा अंदाज वर्तविला आहे. या राज्‍यांत महाराष्‍ट्राचाही समावेश आहे. हवामान विभागाच्‍या अनूसार, 1 जून ते 2 जुलैदरम्‍यान देशभरात 167.7 मिलीमीटर पाऊस झाला. जो सामान्‍यापेक्षा 7 टक्‍क्‍याने कमी आहे. मान्‍सून सामान्‍य राहिला तर या महिन्‍यात 180.7 मिलीमीटर पावसाचा अंदाज विभागने वर्तविला आहे.


  या राज्‍यांत जोरदार पावसाची शक्‍यता
  उत्तराखंड, ऊत्तर प्रदेश, बंगाल, सिक्किम, बिहार, आसाम, मेघालय.

  या राज्‍यात होईल समाधानकारक पाऊस
  महाराष्ट्र, जम्मू-कश्मीर, केरळ, छत्तीसगढड, तामिळनाडू, गुजरात, हिमाचल, पंजाब, उत्तर हरियाणा, झारखंड, अरुणाचल, नागालॅंड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, गोवा, कर्नाटक, ओडिसा.

Trending