आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SBI च्या माजी अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्यांना झोपावे लागले जमिनीवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- स्टेट बॅंक ऑफ इंडिया (एसबीआय)च्या माजी अध्यक्षा अरूंधती भट्टाचार्य यांना नुकतेच एका वाईट प्रसंगाला सामोरे जावे लागले. त्याचं झालं असं की, भट्टाचार्य मुंबईहून लंडनला जेट एअरवेजच्या विमानाने चालल्या होत्या. मात्र, विमानात बिघाड झाल्यानंतर प्रवाशांना उतरविण्यात आले. मात्र तेथे काहीच सुविधा नसल्याने भट्टाचार्य यांना जमिनीवरच झोपावे लागले. विमान सेवेच्या खराब कारभाराचा अनुभव एसबीआयच्या माजी अध्यक्षांना मिळाला.

 

याबाबतची घटना अशी की, भट्टाचार्य या 'बीए 198' या विमानाने मुंबईहून लंडनला चालल्या होत्या. खराब हवामानामुळे हे विमान आधीच उशिरा धावणार होते. मात्र, विमानातून अचानक धूर निघाल्याने अजरबैजानच्या बाकू विमानतळावर उतरविण्यात आले. मात्र, तेथे प्रवाशांसाठी लागणा-या कोणत्याही सुविधा नव्हत्या. त्यामुळे भट्टाचार्य यांच्यासह सहप्रवासी चांगलेच हैराण झाले. पण काहीच इलाज नव्हता. शिवाय तांत्रिक बिघाड असल्याने कोणालाही दोष देता येत नव्हता.

 

मात्र, हे विमान दुरूस्त होईपर्यंत तब्बल 19 तास प्रवाशांना तेथेच ताटकळत थांबावे लागले. अखेर प्रवाशी मिळेल तेथे थांबू लागले व विश्रांती घेऊ लागले. अरूंधती भट्टाचार्य यांनी तर फरशीवर झोपणे पसंत केले. अखेर नादुरूस्त झालेले विमान दुरूस्त झालेच नाही मग 19 तासांनंतर दुस-याच विमानाने भट्टाचार्य यांच्यासह इतर प्रवाशांना लंडनला रवाना करण्यात आले.

झाल्या प्रकाराबाबत जेट एअरवेजने प्रवाशांची माफी मागितली. तसेच तांत्रिक दोष निर्माण झाल्याने या त्रासाला सामोरे जावे लागल्याबाबत खंत व्यक्त केली. भट्टाचार्य यांनीही या तांत्रिक दोषांसोबत क्रू मेंबर्सची शिफ्ट संपल्याने उड्डाण होऊ शकले नसल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...