आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धीरूभाई अंबानींना उद्धट बोलत नीताने कट केला होता फोन, वाचा मजेशीर बाबी....

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशातील आघाडीचे उद्योगपती राहिलेले धीरूभाई अंबानी यांचा आज ( २८ डिसेंबर) जन्मदिवस आहे. त्‍या अनुषंगाने आज आम्ही तुम्हाला अंबानी कुटुंबाविषयी काही रंजक गोष्‍टी सांगणार आहे. नीता अंबानी यांनी आपले सारसे धीरूभाई यांना उद्धट उत्‍तर देत त्‍यांचा फोन कापला होता, या विषयी...

 

धीरूभाईंना उद्धटपणे का बोलल्‍या नीता?

 

- मुंबईमध्‍ये नवरात्री उत्‍सवानिमित्‍त आयोजित एका कार्यक्रमात नीता यांनी भरतनाट्यम सादर केले होते. 
- या कार्यक्रमाला धीरूभाई अंबानीसुद्धा उपस्‍थ‍ित होते. त्‍यांना नीता यांचे नृत्‍य खूप आवडले. त्‍यांनी त्‍याच कार्यक्रमात मुकेश यांच्‍यासाठी नीता यांना पसंत केले.
- घरी जाताच धीरूभाईंनी नीता यांच्या घरी (तेव्हा लॅंडलाईन फोन असायचे) फोन केला आणि म्‍हणाले, '' मी धीरूभाई अंबानी बोलतोय'', हे ऐकताच नीता यांनी ''रॉंग नंबर'' म्‍हणत फोन कट केला. त्‍यावर पुन्‍हा धीरूभाई यांनी कॉल केला. नीता यांना वाटले की, धीरूभाईंच्‍या नावाने कुणीतरी आपल्‍यासोबत मस्‍करी करत आहे. 
- त्‍यामुळे चिडून जावून नीता त्‍यांना म्‍हणाल्‍या, ''तुम्‍ही धीरूभाई असाल तर मी एलिजाबेथ टेलर आहे...'', असे म्‍हणून त्‍यांनी पुन्हा फोन कट केला.

 

धीरूभाई अंबानी यांनी ऑफिसमध्‍ये बोलावून घेतले-

 

- नीता यांनी दोन वेळा फोन कट केल्‍यानंतरही धीरूभाई यांनी तिसऱ्या वेळी त्‍यांना फोन केला. यावेळी नीता यांच्‍या वडिलांनी फोन घेतला. 
- धीरूभाईचा आवाज ऐकताच वडिलांनी अखेर नीता यांच्‍याकडे फोन दिला आणि सोज्‍वळपणे बोलण्‍याचे सांगितले. नीता यांनी फोन घेतला आणि म्‍हटले, "जय श्री कृष्ण." 
- त्‍यावर धीरूभाई यांनी नीता यांना कार्यक्रमाला येण्‍याचे सांगितले. ते ऐकून नीता घाबरल्‍या. पण, एवढा मोठा व्‍यावसायिक आपल्‍याला का भेटू इच्छितो हे जाणून घेण्‍यासाठी त्‍या आपल्‍या वडिलांसोबत कार्यालयात गेल्‍या.

 

मुकेशला भेटायला आवडेल का?

 

- कार्यालयात पोहचल्‍यानंतर धीरूभाई आणि नीता यांच्‍यात गप्‍पा सुरू झाल्‍या. धीरूभाईंनी त्‍यांना विचारले, ''तू काय करतेस, तुला काय आवडते ?'' 
- काही वेळानंतर विचारले '' माझा मुलगा मुकेशला भेटणे तुला आवडेल का?," त्‍यावर नीता यांनी होकारार्थी उत्‍तर दिले. नीता सांगतात की, मुकेश आणि त्‍यांच्‍यामध्‍ये धीरूभाईंनी मॅचमेकरची भूमिका पार पडली.

 

पुढील स्लाईड्सद्वारे वाचा व पाहा, नीता अंबानींची मुकेश यांच्यासोबतची लव्ह स्टोरी आणि निवडक PHOTOS....

बातम्या आणखी आहेत...