आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्‍पसंख्‍याक महाविद्यालयात आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात जाणार- मंत्री विनाेद तावडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अल्पसंख्याक महाविद्यालयात आरक्षण न देण्यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्याच्या मागणीसाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार अाहे. राज्याचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री राजकुमार बडोले व उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी ही माहिती दिली.

 

मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे संवैधानिक आरक्षण अल्पसंख्याक महाविद्यालयातून वगळल्याबाबत विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत मंत्रालयात झालेल्या चर्चेत ते बाेलत हाेते. या वेळी बडोले म्हणाले, पूर्वीप्रमाणे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अल्पसंख्याक महाविद्यालयात आरक्षण देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या हितासाठी राज्य शासन मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगितीसाठी सर्वोच्च न्यायालयात तत्काळ अपील दाखल करणार आहे.’ तर तावडे म्हणाले, ‘कुठल्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी शासन घेईल. तसेच सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाकडून सर्वोत्तम वकील देण्यात येणार आहे.’ या वेळी आमदार भाई गिरकर, आमदार गौतम चाबुकस्वार, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव डिंगळे, विधी व न्याय, अल्पसंख्याक विभागाचे अधिकारी व विविध विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...