आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाडा-विदर्भात येत्या दाेन दिवसांत पुन्हा अवकाळी पाऊस, गारपिटीची शक्‍यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - येत्या दाेन दिवसांमध्ये पुन्हा एकदा गारपीट अाणि अवकाळी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गेल्या महिनाभरात तिसऱ्यांदा गारपिटीच्या ढगांचे सावट अाहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाच्या पट्ट्याची द्राेणीय स्थिती निर्माण झाल्याने अवकाळी पाऊस हाेण्याची शक्यता अाहे.

 

मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा अाणि विदर्भामध्ये ७ मार्च राेजी अवकाळी पावसाची शक्यता अाहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या अाठवड्यामध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीचा व्यक्त केलेला अंदाज हवामान विभागाने मागे घेतला हाेता. या अाठवड्यात पुन्हा तो नव्याने वर्तवण्यात अाला अाहे.

बातम्या आणखी आहेत...