आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 लाखांची लाच घेतांना वनपालला रंगेहाथ पाकडले; जप्‍त केलेली वाहने सोडण्‍यासाठी मागितली लाच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोनावळा- जप्‍त केलेले वाहने सोडण्‍यासाठी अकरा लाखांची लाच घेतांना वनपालास रंगेहात पक‍डले आहे. लोणावळा येथील सिंहगड टेकनीकल इन्स्टिट्यूट येथे रात्री आठ वाजता ही कारवाई करण्‍यात  आली. 


सिंहगड टेकनीकल इन्स्टिट्यूटने येथे जमीन खरेदी केलेली आहे. या जमिनीच्‍या सातबा-यावर वन अशी नोंद लागण्‍याने वन विभागाच्‍या अधि-यांनी आक्षेप घेतला होता. याठीकाणी खोदकाम करतांना वन विभागाच्‍या अधिका-यांनी जेसीबी आणि अन्‍य काही वाहने जप्‍त केली होती. ही वाहने सोडण्‍यासाठी आणि बांधकामात कोणताही अडथळा न करण्‍यासाठी वनपाल विलास बाबाजी निकम याने अकरा लाखांची लाच मागितली होती. या प्रकरणी तक्रारदाराने लाचलूचपत विभागाकडे तक्रार केली. प्रकरणाची शहानीशा केल्‍यानंतर सापळा रचून वनपालास रंगेहात पकडण्‍यात आले.  

बातम्या आणखी आहेत...