आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिसेप्शनवर बसली होती ही मुलगी, अचानक हल्लेखोरांनी केला असा गोळीबार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हल्लेखोर हे सुरेश पुजारी गँगशी निगडित असल्याचे सांगण्यात येत आहे. - Divya Marathi
हल्लेखोर हे सुरेश पुजारी गँगशी निगडित असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबई- भिवंडी येथे बुधवारी दुपारी एका 3 स्टार हॉटेलमध्ये रिसेप्शनवर बसलेल्या मुलीवर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. सुरेश पुजारी गँगच्या हल्लेखोरांनी हा गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे. या मुलीच्या पायाला गोळी लागली असून तिला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुरेश पुजारी गँग मागील काही दिवसांपासून या हॉटेलच्या मालकाकडे एक कोटीची खंडणी मागत आहे. पैसे न दिल्याने धमकावण्यासाठी हा गोळीबार करण्यात आल्याचा अंदाज आहे. 

 

 

कॅमेऱ्यात कैद झाली घटना
- हॉटेल मालकाच्या फिर्यादीवरुन कोनगाव पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. घटना बुधवारी दुपारी 3 वाजता घडली.
- कल्याण भिवंडी रोडवर असणाऱ्या के एन पार्क हॉटेलमध्ये दोन अज्ञात व्यक्ती अचानक शिरल्या. त्यांनी रिसेप्शनवर बसलेल्या 25 वर्षाच्या रिसेप्शनिस्ट स्वरा शिरसाट हिच्यावर गोळीबार केला.

- गोळीबाराची ही घटना हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यात आरोपी खुलेआम गोळीबार करताना दिसत आहेत. 

 

 

पोलिसांना मिळाली चिठ्ठी
- दोन्ही हल्लेखोरांनी आपली ओळख लपविण्यासाठी चेहरा झाकलेला होता. पोलिसांना रिसेप्शन जवळ एक चिठ्टी मिळाली असून त्यात खंडणीची मागणी करण्यात आली आहे. खंडणी न दिल्यास परिणाम भोगावे लागतील असा इशाराही या चिठ्ठीत देण्यात आला आहे. चिठ्ठी सुरेश पुजारीचे नावही लिहिलेले आहे.
- सुरेश पुजारीने एका मीडिया हाऊसला फोन करुन फक्त धमकविण्यासाठी हा गोळीबार केल्याचे सांगितले आहे. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...