आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या सुंदर चेह-यामागे दडला आहे खतरनाक दिमाग, अनेकांना असे लुबाडले...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घरकामासाठी ठेवलेल्या महिलेला लुबाडणारी महिला, जी स्वत:ला भाजपा महिला उपाध्यक्ष सांगते. - Divya Marathi
घरकामासाठी ठेवलेल्या महिलेला लुबाडणारी महिला, जी स्वत:ला भाजपा महिला उपाध्यक्ष सांगते.

मुंबई- मुंबईतील मालाड पोलिसांनी भारतीय जनता पक्षाच्या एका महिला पदाधिकारीला नोकरानीची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली आहे. दिसायला अतिशय सुंदर असलेली ही महिला आपण करोडपती असल्याने सांगून गरजू महिलांना नोकरीवर ठेवायची. यानंतर त्यांना गोड बोलून त्यांच्याशी जवळिक निर्माण करायची दामदुपटीच्या अमिषाने पैसा, दागिने घ्यायची व ते हडप करायची. जेव्हा नोकरानी पैसे व दागिने परत मागायची तेव्हा ही महिला खोटे आरोप करून त्यांना तुरूंगात घालायची. असा समोर आला ठग महिलेचा खरा चेहरा....

 

- अटक झालल्या महिला नेत्याचे नाव पेट्रीशिया डिसूजा (33) आहे. ती स्वत:ला दक्षिण मुंबईतील भाजपची माजी महिला उपाध्यक्ष सांगायची. लक्ष्मी देवेंद्रन नावाच्या एका नोकर महिलेने तिच्याविरूद्ध तक्रार दिल्यानंतर मालाड पोलिसांनी पेट्रीशियाला अटक करण्यात आली आहे. 
- लक्ष्मी देवेंद्रन हिने सांगितले की, जानेवारी 2017 पासून मी पेट्रीशिया डिसूजाच्या घरी काम करत होती. आरोपी महिला नेताने लक्ष्मीला कामावर ठेवण्याआधी संपूर्ण माहिती घेतली. 
- लक्ष्मीच्या पतीचा मृत्यू झाला आहे तसेच तिला दोन मुले आहेत. लक्ष्मीने पेट्रीशियाला सांगितले की, ती आपल्या मुलांना हॉस्टेलमध्ये ठेऊ इच्छित आहे. यासाठी मी काही पैसे जमा केले आहेत.
- पेट्रीशियाने एक दिवस लक्ष्मीला बोलावले आणि सांगितले की, तू असे पैसे ठेवले तर इनकम टॅक्स लागेल. त्यापेक्षा ते पैसे माझ्याकडे ती मी तुला दामदुप्पट करून देईन. शिवाय माझ्या ओळखीने मुलांना हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळवून देईन. 
- लक्ष्मीने आता आरोप केला की, पेट्रीशियाने गोड बोलून माझ्याकडून पैसे काढून घेतले. मात्र, जेव्हा मी पैसे मागितले तिने टाळाटाळ सुरूवात केली. सोबत मुलांना हॉस्टेलमध्ये प्रवेशही घेऊन दिला नाही. दोन महिन्याचा कामाचा पगार दिला नाही.
- लक्ष्मीने जेव्हा पैसे मागितले तेव्हा तिने चोरीच्या खोट्या आरोपाखाली तुरूंगात घालायला लावेन अशी धमकी दिली.
- यानंतर लक्ष्मीने मालाड पोलिस ठाण्यात महिला नेत्याविरोधात तक्रार दाखल केली.

 

समोर आल्या अनेक महिला-

 

- तपासात हे समोर आले आहे की, पेट्रीशिया डिसूजाने केवळ लक्ष्मीला फसविले नाही तर त्याआधी तिने अशा अनेक महिलांना ठगवले आहे.
- पेट्रीशियाला अटक केल्यानंतर अनेक महिला समोर आल्या आहेत ज्यांना तिने फसविले आहे.
- सुरेखा नावाच्या आणखी एका मोलकरीण महिलेने सांगितले की, मी जेव्हा तिच्याकडे कामाला होती तेव्हा माझ्याकडून पैसे दामदुप्पट करण्याच्या नावाखाली दागिने आणि पैसे घेतले आहेत. मात्र, अद्याप ते परत दिलेले नाहीत.
- पोलिसांनी सांगितले की, पेट्रीशिया डिसूजाविरोधात कलम 406, 420 नुसार, गुन्हा दाखल करत बोरीवाली कोर्टात हजर केले. कोर्टाने तिला पोलिस कोठडी सुनावली आहे.
- पोलिसांच्या माहितीनुसार, या महिलेने आपण भाजपचे नेते असल्याचे सांगत सुमारे डझनभर महिलांना करोडोंचा सुना लावला आहे.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, या घटनेशी संबंधित माहिती व फोटोज...

बातम्या आणखी आहेत...