आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GOA- प्रियकरासमोरच युवतीवर सामूहिक बलात्कार, विवस्त्र फोटो काढून केली मारहाण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पणजी- दक्षिण गोव्यातील बीचवर एका युवतीवर तीन नराधमांनी तिच्या प्रियकरासमोरच बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपींनी तिचे विवस्त्र फोटोदेखील काढले पण हतबल प्रियकर तिंघापुढे काहीही करु शकला नाही. हा प्रकार 24 मे च्या रात्री घडला असून या प्रकरणी पोलिसांनी तीनपैकी दोन आरोपींना शुक्रवारी रात्री         अटक केली. तिस-या फरार आरोपीचा शोध सुरु आहे. 


गोवा क्राईम ब्रॅंचच्या माहितीनुसार, दक्षिण गोवा येथील एका समुद्र किनाऱ्यावर प्रेमी युगूल संध्याकाळी गप्पा मारत बसले होते. यादरम्यान तीन तरुण तिथे पोहोचले. त्या तिघांनी त्यांना हटकले यानंतर त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. तिघांनी त्या युगूलाला मारहाण केली, तसेच त्यांना विवस्त्र करुन त्यांचे छायाचित्र देखील काढले. यानंतर त्या तिघांनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. पीडित तरुणीच्या प्रियकराला नराधमांनी दम मारहाण केल्याने तो काहीच करु शकला नाही. या प्रकरणी भादंवि 376 (बलात्कार) आणि 394 (लूट) अतंर्गत कोलवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेले आरोपी हे मध्यप्रदेशातील इंदोर येथील राहणारे आहेत. राम संतोष बहरिया आणि संजीव धनंजय पाल अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या तिस-या साथीदाराचा शोध सुरु आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...