आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बच्चू कडूंचा काँग्रेस-भाजपला दणका; प्रहार संघटनेची यवतमाळमध्ये दिमाखदार एंट्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ- यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा नगरपालिका निवडणुकीत अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने झेंडा फडकावला आहे. विशेष म्हणजे आपले अमरावती हे कार्यक्षेत्र सोडून बच्चू कडू यांनी भाजप आणि काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षांना पाणी हे भव्य यश संपादित केले आहे. त्यामुळे त्याचे मोल अधिक आहे. 

 

पांढरकवडा नगरपालिकेत बच्चू कडू यांच्या प्रहार युवा शक्ती संघटनेने 19 पैकी तब्बल 14 जागा जिंकल्या. सोबतच प्रहार संघटनेच्याच वैशाली नहाते या 1270 मतांनी बाजी मारत नगराध्यक्षपदी निवडून आल्या. या विजयामुळे अमरावती जिल्ह्याबाहेर पहिल्यांदाच प्रहार संघटनेचा नगराध्यक्ष, नगरपालिकेत सत्ता आली आहे.

 

या निवडणुकीत राष्ट्रीय पक्ष म्हणवल्या जाणा-या भाजपला तीन जागा, तर काँग्रेसला आणि शिवसेनेला प्रत्येकी 1 जागेवर यश मिळवता आले. राष्ट्रवादीला खातेही खोलता आले नाही.

बातम्या आणखी आहेत...