Home | Maharashtra | Mumbai | yavatmal youth married his friend, it may first gay marriage of india?

यवतमाळमध्ये समलैंगिक विवाह: चीनच्या मित्रासोबत तरूणाचे सात फेरे, पाहा PHOTOS

दिव्यमराठी वेब टीम | Update - Jan 12, 2018, 06:33 PM IST

यवतमाळमध्ये देशातील पहिला समलिंगी विवाह सोहळा पडला. भारतात पार पडलेला हा कदाचित पहिलाच समलिंगी विवाह सोहळा आहे.

 • yavatmal youth married his friend, it may first gay marriage of india?

  यवतमाळ- यवतमाळ शहरातील एका तरूणाने आपल्या मित्रासोबत समलैंगिक विवाह केल्याचे समोर आले आहे. हा विवाहसोहळा अमेरिकेसह यवतमाळमध्ये पार पडला असून, नुकतेच शहरातील एका बड्या हॉटेलात रिसेप्सन सोहळा पार पडल्याचे फोटोज आता सोशल मिडियात व्हायरल झाले आहेत. यवतमाळचा तरूण हा वर असून, चीनी तरूण वधू आहे. दोघेही अमेरिकेतच राहतात. दोघेही एकाच कंपनीत नोकरीला आहेत. गेली अनेक महिने ते 'लिव्ह इन रिलेशनशिप' होते.

  यवतमाळमधील एका हॉटेलात हा रिसेप्शन सोहळा नुकताच पार पडला असून, कुटुंबियांनी गुप्तता पाळल्यानंतरही सोशल मिडियात त्यांच्या एकत्र पोजचे फोटोज व्हायरल झाले आहेत. दरम्यान, संबंधित तरूणाच्या आईचा विरोध वगळता त्याच्या कुटुंबियांचा लग्नाला पाठिंबा होता त्यामुळे हा चीनच्या तरूणांसोबतचा विवाहसोहळा कोणत्याही विघ्नाशिवाय पार पडल्याचे समोर येत आहे.

  याबाबतची हकीकत अशी की, यवतमाळ शहरातील एका पुस्तक व्यासायिकाचा मुलगा अमेरिकेत नोकरीनिमित्त राहतो. त्याला तेथे गलेलठ्ठ पगाराची नोकरी आहे. तेथे त्याची चीनच्या एका तरूणासोबत ओळख झाली. ओळखीतून मैत्री व पुढे प्रेम झाले. पुढे या दोघांनी विवाहाचा निर्णय घेतला. याचाच भाग म्हणून त्यांनी अमेरिकेतच कोर्ट मॅरेज केल्याचे सांगितले जात आहे.

  प्रतिष्ठित कुटुंबातील मुलगा-

  दुसरीकडे, इकडे भारतात यवतमाळमध्ये या तरूणांसाठी परिसरातील मोठमोठी स्थळे येत होती. या तरूणांचे कुटुंबाला प्रतिष्ठित व्यावसायिक म्हणून शहरात मान-पान आहे. त्यामुळे त्यांच्या मुलासोबत अनेक मुलींचे पालक लग्नासाठी तयार होते. त्यामुळे आई-वडिल जेव्हा लग्नाबाबत विचारायचे तेव्हा मुलगा तो टाळायचा व मला इतक्यात लग्न करायचे नाही असे सांगून विषय टोलवून द्यायचा. अखेर घरच्यांनी त्याला विश्वासात घेऊन विचारले असता त्याने आपण समलैंगिक असून, या तरूणावर आपले प्रेम असल्याचे सांगितले व त्याच्यासोबत आपल्याला लग्न करायचे असल्याचे सांगितले. या बातमीने कुटुंबियांना सुरूवातीला प्रचंड मानसिक धक्का बसला. मात्र, त्याबाबत सर्व माहिती घेतल्यानंतर वडिल तयार झाले.

  नुकताच यवतमाळ शहरातील एका हॉटेलात हा रिसेप्शन सोहळा पार पडला. हा सोहळा अतियश गुप्ततेत पार पडला. यासाठी मोजक्याच नातेवाईकांना आमंत्रित केले होते. मात्र, काही दिवसातच या विवाहाचे फोटो व्हायरल झाल्याने ही बातमी फुटली.

  यवतमाळमध्येच विवाह झाल्याचे काहींचे म्हणणे-

  या विवाहाबाबत दोन मतप्रवाह पुढे येत आहेत. काहींचे म्हणणे आहे की, या दोघांचे यापूर्वीच अमेरिकेत कोर्ट मॅरेज झाले आहे. भारतात म्हणजे यवतमाळमध्ये फक्त रिसेप्शन सोहळा पार पडला तर काहींचे म्हणणे आहे की, भारतीय पद्धतीने यवतमाळ परिसरातील एका मंदिरात या दोघांचा विवाह पार पडला व त्यानंतर येथील एका पॉश हॉटेलात रिसेप्शन पार पडले. विशेष म्हणजे या तरूणाचा विवाह वैदिक पद्धतीने पार पडल्याचे समोर येत आहे. लग्नापूर्वी वर-वधूला पारंपारिक पद्धतीने हळद लावण्यात आली. लग्नाचे कपडे, वेडिंग रिंग आदी सोपस्कर पार पडले. त्यानंतर हार टाकून वैदिक मंत्रोच्चारात हे लग्न पार पडले. मात्र, भारतात समलैंगिक विवाहाला अद्याप मान्यता व कायदेशीर परवानगी नसल्याने अमेरिकेत कोर्ट मॅरेज तर येथे फक्त रिसेप्शन पार पडल्याचे सांगितले जात आहे.

  पुढे स्लाईडद्वारे पाहा, वैदिक पद्धतीने पार पडले हे लग्न....

 • yavatmal youth married his friend, it may first gay marriage of india?

  विवाह वैदिक पद्धतीने-

  यवतमाळच्या या तरूणाचा विवाह एका मंदिरात वैदिक पद्धतीने पार पडला. लग्नापूर्वी वर-वधूला पारंपारिक पद्धतीने हळद लावण्यात आली. लग्नाचे कपडे, वेडिंग रिंग आदी सोपस्कर पार पडले. त्यानंतर हार टाकून वैदिक मंत्रोच्चारात हे लग्न पार पडले. त्यानंतर यवतमाळमधील एका पॉश हॉलेटात रिसेप्शन सोहळा पार पडला.

 • yavatmal youth married his friend, it may first gay marriage of india?

  यवतमाळचा तरूण हा वर असून, चीनी तरूण वधू आहे. दोघेही अमेरिकेतच राहतात. दोघेही एकाच कंपनीत नोकरीला आहेत. गेली अनेक महिने ते 'लिव्ह इन रिलेशनशिप' होते.

Trending