आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Mumbai-वडिलांनी मोबाईल हिसकावला, नाराज मुलीने विहिरीत ऊडी मारुन केली आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- वडिलांनी मोबाईल काढून घेतल्याने नाराज झालेल्या युवतीने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलगी दिवसभर मोबाईलवर चॅटिंग करत असे यामुळे वडील रागावले आणि तिच्याकडून मोबाईल हिसकावून घेतला. यानंतर युवतीने रागाच्या भरात सोडले. नंतर तिच्या घरच्या लोकांनी शोधाशोध केली असता काही वेळाने तिचा मृतदेह एका विहिरीत आढळला.

 

मंगेश नावाच्या एक इसम एका प्रायव्हेट क्लिनिकमध्ये वार्डबायचे काम करतो. त्याची मुलगी श्रद्धाला हिच्या (वय 22) मेंदूवर परिणाम झाला होता. त्यामुळे तिचे मेंदूचे 2015 मध्ये आॅपरेशन केले होते. यानंतर तिच्या मेंदूवर ताण येऊ नये म्हणून तिचे 10 वी नंतरचे शिक्षण बंद केले होते. श्रद्धा मागील काही दिवसांपूर्ण संपूर्ण दिवसभर मोबाईलवर चॅटिंगमध्ये व्यस्त असायची. जेव्हा तिचा मोबाईल चेक केला तेव्हा ती आपल्या बाॅयफ्रेंडसोबत चॅट करत असल्याचे उघड झाले. यानंतर श्रद्धाला रागावले व तिचा मोबाईल काढून घेतला. 

 

याच रागातून श्रद्धा घर सोडून गेली. घरच्यांना वाटले की ती काही वेळात परत येईल पण बराच वेळ झाला तरी ती परतली नाही. त्यांनी याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरु करताच तिचा मृतदेह एका विहिरीत सापडला. 

 

बातम्या आणखी आहेत...