आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई: दिल्लीतील पत्रकार तरूणीची छेड काढल्याप्रकरणी तरूणास अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- दिल्लीतील एका 25 वर्षीय पत्रकार तरूणीची मुंबईत छेड काढल्याप्रकरणी 19 वर्षीय तरुणास रविवारी अटक करण्यात आली. लव कुळे असे या आरोपीचे नाव आहे.

 

दिल्लीतील ही पत्रकार तरूणी मुंबईत आपल्या कामानिमित्त आली होती. बुधवारी रात्री (16 मे ) संबंधित तरूणी पत्रकार ती थांबलेल्या कुलाबातील हॉटेलकडे जात होती. त्याच वेळी लहु कुळे हा मोटरसायकलवरून तेथून जात असताना त्याने संबधित पत्रकार नको त्या ठिकाणी स्पर्श करत छेड काढली. या घटनेनंतर पत्रकार तरूणीने पोलिसांत तक्रार दिली होती.

 

दरम्यान, याप्रकरणाचा तपास सुरू असल्याचे विभाग -1 चे पोलिस उपायुक्त मनोज कुमार शर्मा यांनी सांगितले आहे. सुंदर नगरी येथून लहु कुळे याला अटक करण्यात आली. 

बातम्या आणखी आहेत...