आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिनच्या कन्येस त्रास देणारा तरुण अटकेत; वारंवार फोन करून करायचा लग्नाची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची कन्या साराशी फाेनवरून गैरवर्तन केल्याप्रकरणी मुंबई पाेलिसांनी काेलकाता येथून देबकुमार मैती (३२) या तरुणाला अटक केली. हा तरुण गेल्या काही दिवसांपासून फाेन करून तिला त्रास देत असल्याची तक्रार तेंडुलकर कुटुंबीयांनी बांद्रा ठाण्यात केली हाेती.  


मला साराशी लग्न करायचे अाहे, असे मैती वारंवार फाेनवर म्हणायचा. त्याची अनेकदा समजूत काढूनही त्याने फाेन करणे सुरूच ठेवले. अखेर सचिनने बांद्रा ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीची त्वरित दखल घेऊन मुंबई पाेलिसांनी चाैकशी सुरू केली. प. बंगालमधील पूर्व मिदनापूर येथील महिसादाेल भागातून हे फोन करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार, प. बंगाल पोलिसांच्या मदतीने मैती याला अटक केली.

 

पुढे स्लाई़डद्वारे पाहा, यासंबंधित फोटोज व माहिती...

बातम्या आणखी आहेत...