आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई: अंबरनाथमध्ये प्रियकराची हत्या करून प्रेयसीवर बलात्कार, अज्ञात लुटारूचे कृत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अंबरनाथमधील टिटवाळा भागात फिरायला गेलेल्या प्रियकर-प्रेयसीला गाठून त्यांना लुटले. यानंतर प्रियकर तरूणाची हत्या केली व त्याच्या प्रेयसीवर बलात्कार केला. अंबरनाथ चिंचपाडा-नालंबी गाव रस्त्यावरील एका डोंगरावर सोमवारी रात्री 8 च्या सुमारास ही घटना घडली. गणेश दिनकर (वय 26) असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे.

 

याबाबतची माहिती अशी की, गणेश दिनकर हा तरूण आपल्या प्रेयसीसह फिरायला गेला होता. अंबरनाथ पश्चिम भागातील चिंचपाडा- नालंबी गावाच्या रस्त्यावर कमी रहदारी असते. शिवाय हा भाग डोंगराळ असल्याने लोक येथे फिरायला येत असतात. काही तरूण जोडपी सुद्धा येथे एकांत शोधतात. गणेश सुद्धा आपल्या प्रेयसीसह तेथे सोमवारी रात्री गेला होता.

 

रात्री 8 च्या सुमारास गणेश आपल्या प्रेयसीसह बोलत असताना तेथे अचानक एक तरूण आला. त्यांनी गणेशकडे मोबाईलसह पैशांची मागणी केली तसेच बुलेट गाडीची चावी मागितली. मात्र, गणेशने बुलेटची चावी देण्यास नकार दिला. यानंतर त्या चोरट्याने गणेशवर गोळ्या झाडल्या व त्याच्या प्रेयसीवर बंदुकीचा धाक दाखवून झाडाझुडपात बलात्कार केला. यानंतर तो लुटारू तेथून पसार झाला.

 

यानंतर पीडित तरूणीने तेथे येणा-या - जाणा-या लोकांकडे मदत मागितली. मग तेथील काही लोकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यानंतर घाबरलेल्या अवस्थेतील तरूणीला पोलिसांनी मदत केली. पुढील तपास पोलिस करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...