आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजुबाबाविरोधात बोललास तर तुझ्या आईसारखे हाल करू, 1993 Bomb Blast पीडित तरुणाला धमकी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- 'संजुबाबाविरोधात काहीही बोललास तर तुझ्या आईचे जसे तुकडे केले तसे तुझे करू', अशी धमकी 1993 बॉम्‍ब स्‍फोटातील पीडित तुषार देशमुख यांना मिळाली आहे. काल बुधवारी एका वृत्‍तवाहीनीवरील चर्चासत्रात त्‍यांनी संजय दत्‍त विरोधात टिप्‍पणी केली होती. यावरून आज गुरूवारी सकाळी त्‍यांना हा धमकीचा कॉल आला. तुषार देशमुख यांच्‍या आईचे 1993च्‍या बॉम्‍बस्‍फोटात मृत्‍यू झाला आहे.

 

तुषार हे हॉटेल व्‍यावसायिक असून ते दादर येथे राहतात. त्‍यांच्‍या लहानपणीच त्‍यांच्‍या आईचा मुंबई साखळी बॉम्‍बस्‍फोटामध्‍ये मृत्‍यू झाला होता. त्‍यामुळे नुकत्‍याच रिलीज झालेल्‍या संजू सिनेमाविषयी चर्चा करण्‍यासाठी त्‍यांना एका वृत्‍त वाहिनीने निमंत्रित केले होते. या चर्चासत्रामध्‍ये संजय दत्‍तच्‍या चुकांचे उदात्‍तीकरण करण्‍यात आल्‍याचे मत त्‍यांनी मांडले. तसेच संजय दत्‍तवर टीकाही केली.

 

त्‍यानंतर आज(गुरूवारी) सकाळी पावणे बाराच्‍या सुमारास त्‍यांना एका आंतरराष्‍ट्रीय दुरध्‍वनीवरून कॉल आला. त्‍यामध्‍ये 'संजूबाबा के खिलफा कुछ भी बोला तो, तेरे माँ जैसे तुकडे तेरे भी कर देंगे', अशी धमकी त्यांना देण्यात आली. या प्रकरणी तुषार यांनी माहिम पोलिस स्‍टेशनमध्‍ये तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञात व्‍यक्‍तीविरोधात अदखलपात्र गुन्‍हा दाखल केला आहे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, पोलिस स्‍टेशनमध्‍ये दाखल करण्‍यात आलेल्‍या तक्रारीची प्रत... 

बातम्या आणखी आहेत...