आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत पेट्रोल 84 रूपयांवर, आदित्य ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर टीका, म्हणाले...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो

मुंबई- कर्नाटक निवडणूक संपताच केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलचे भाव वाढवले आहेत. या दरवाढीसोबतच मुंबईत पेट्रोलच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. रविवारी मुंबईत पेट्रोलचा भाव 84 रूपये लिटर असा इतका उच्चांकी होता. दरम्यान, इंधन दरवाढीवरून युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. 

 

मुंबईत 84 रूपये पेट्रोल होताच आदित्य यांनी टि्वट केले. या टि्वटमध्ये आदित्य ठाकरे म्हणतात, मुंबईत पेट्रोल ₹ 84!! 2014 चा प्रचार विसरलोच... “बहुत हुई महंगाई की मार.. अब की बार..” नहीं करेंगे गलती बार बार. कर्नाटका निवडणुकीनंतर भाव वाढले.. कदाचित डिसेंबरमध्ये परत निवडणुकीसाठी कमी करतील.. पण भारतीय जनतेला वचनं दिली, ती पूर्ण का नाही करू शकत केंद्र सरकार? 

बातम्या आणखी आहेत...