आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभ बच्चन यांचे अनधिकृत बांधकाम दंड आकारून नियमित; हिराणी यांनाही दिलासा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह इतर ६ प्रतिष्ठित नागरिकांनी केलेले अनधिकृत बांधकाम महानगरपालिकेने दंड आकारून नियमित केले. सामान्य नागरिकांनी अनधिकृत बांधकाम केल्यास त्वरित बुलडोझर चालवणाऱ्या महापालिकेने मोठ्या व्यक्तींच्या अनधिकृत बांधकामाला मात्र दंड आकारून अभय दिल्याने सामान्य जनता नाराजी व्यक्त करत आहे.

    
बच्चन आणि इतर काही जणांनी गोरेगाव येथील सोसायटीत अनधिकृत बांधकाम केले होते. या बांधकामास नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर मालक/रहिवासी विकासक यांच्यातर्फे वास्तुविशारद शशांक कोकीळ अँड असोसिएट्स यांनी ५ जानेवारी २०१७ रोजी मंजूर आराखड्यात नसलेल्या बाबी मंजूर करण्यासाठी पालिकेकडे अर्ज केला होता. त्यानंतर अनधिकृत बांधकाम दंड आकारून नियमित करण्यात आले.  माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती पालिकेकडे मागवली होती. त्यात वरील उत्तर देण्यात आलेले आहे.    
अमिताभ बच्चन, राजकुमार हिराणी, ओबेरॉय रिअॅलिटी, पंकज बलानी, हरेश खंडेलवाल, संजय व्यास, हरेश जगतानी अशा सात जणांनी मंजूर आराखड्यानुसार बांधकाम न करता वेगळे बांधकाम केल्याचे आढळून आले होते.पालिकेने  आदेश जारी करत अनधिकृत बांधकाम स्वतःहून काढून टाकण्याचे निर्देश दिले होते. 

बातम्या आणखी आहेत...