आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगणवाडी सेविकांच्या निवृत्तीचे वय 65 वर्षे; मेस्मातून वगळणे अशक्य : पंकजा मुंडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अंगणवाडी सेवकांच्या निवृत्तीचे वय ६० वर्षांवरून पुन्हा ६५ वर्षे करण्याचा निर्णय महिला बालविकास विभागाने घेतल्याची घोषणा मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत केली. यापूर्वी निवृत्तीचे वय ६५ होते. मात्र ते ६० वर आणल्याने अंगणवाडी सेविकांत नाराजी पसरली होती. यामुळे पुन्हा वयोमर्यादेत वाढ करण्याचा निर्णय झाला आहे.  


पंकजा मुंडे म्हणाल्या, अंगणवाडी सेविकांचे मानधन अाधीच दरमहा चारवरून ६,५०० रुपये केले आहे. अंगणवाडी सेविकांना मेस्मा या अत्यावश्यक सेवा कायद्यातून वगळण्याबाबत तूर्तास तरी विचार नाही. कारण अंगणवाडी सेविकांना अत्यावश्यक सेवांमध्ये आणण्याबाबत उच्च न्यायालयात आम्ही प्रतिज्ञापत्र दिले आहे. तसेच अत्यावश्यक सेवांमध्ये न आणल्यास मुलांच्या पोषणाचा प्रश्न निर्माण होईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले.