आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- वर्ष २००७ याच वर्षी दीपिका पदुकाेनने बाॅलीवूड चित्रपटसृष्टीत प्रवेश केला हाेता, तर तिकडे एमा स्टाेन या अभिनेत्रीनेही छाेट्या पडद्यावरून हाॅलीवूडमध्ये पाऊल ठेवले हाेते. अाज या दाेन्ही अभिनेत्री कारकीर्दीच्या सर्वाेच्च शिखरावर अाहेत. दीपिका ही भारत देशातील, तर एमा जगातील सर्वात महागडी अभिनेत्री अाहे. कारण दीपिकाला प्रत्येक चित्रपटासाठी १२ ते १३ काेटी रुपयांचे मानधन मिळत असल्याचे सांगितले जात अाहे. तथापि, चित्रपट ताऱ्यांच्या कमाईच्या अाकड्यांची पुष्टी हाेणे कठीण अाहे. याबाबत केवळ अंदाज लावले जातात. फाेर्ब्जनुसार दीपिका पदुकाेन ही बाॅलीवूडची सर्वात महागडी अभिनेत्री अाहे. २०१७ मध्ये तिने ७० काेटी रुपयांची कमाई केल्याचा अंदाज अाहे. तसेच एमाची कमाई हाेती २६ मिलियन डाॅलर्स (सुमारे १ अब्ज ६६ काेटी रुपये).
दीपिका व एमाने अनेक राेमॅन्टिक काॅमेडी चित्रपटांमध्ये काम केले अाहे; परंतु साेबतच नव्या भूमिका दाेघींना अाकर्षित करत असतात. दाेघींनी अशा चित्रपटांची निवड केली, ज्यात त्यांना चित्रपटातील सहायक कलाकारांएवढे महत्त्व व पडद्यावर अधिकाधिक वेळ दृश्ये मिळतील. तथापि, दीपिकाने अनेक कलाकार असलेले विविध चित्रपटही केले. सध्या ती स्त्रीप्रधान चित्रपटांना प्राधान्य देतेय. हाॅलीवूडच्या ‘ट्रिपल एक्स- जेंडर केज’मध्ये काम करताना अभिनेता विन डिझेलएवढेच महत्त्व कसे मिळेल याकडेही दीपिकाने पूर्ण लक्ष दिले हाेते. एमा स्टाेनने अापल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात विनाेदी चित्रपटांपासून केली. सुपरबॅड, हाऊस बनी व घाेस्ट अाॅफ गर्लफ्रेंड पास्ट हे राेमॅन्टिक चित्रपट हाेते. तसेच ‘झाॅम्बीलॅण्ड’ हा हाॅरर काॅमेडी, तर ‘इझी ए टीन’ विनाेदी चित्रपट हाेता. गत पाच वर्षांत एमाने वेगवेगळ्या प्रकारचे सिनेमे केले अाहेत. त्यात दाेन सुपरहीराे चित्रपट ‘अमेझिंग स्पायडरमॅन-१ व २’चा समावेश अाहे.
गुन्हेगारी विश्वावरील मारधाडपट ‘गंॅगस्टर स्क्वाॅड’मध्येही ती चमकली हाेती. त्यानंतर तिचा ‘बर्डमॅन’ हा ब्लॅक काॅमेडीपट अाला. दीपिकाच्या स्त्रीप्रधान चित्रपटांतील प्रमुख भूमिकांच्या उलट एमाने नामांकित अभिनेत्यांसाेबत जाेडी बनवत खास कथानक असलेल्या चित्रपटांना प्राधान्य दिले.
दाेघींनी आपले शिक्षण अपूर्ण साेडून घडवली चित्रपटातील कारकीर्द
दीपिका पदुकाेन व एमा स्टाेन या दाेघी अभिनेत्रींनी अापले शिक्षण अपूर्ण साेडून दिले. दीपिका माॅडेलिंगमधील अतिकामामुळे पदवीचे शिक्षण पूर्ण करू शकली नाही, तर एमाने बाॅलीवूडमध्ये करिअर करण्यासाठी शालेय शिक्षण मध्येच साेडून दिले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.