आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Food Poisoning In Mahad, महडमध्ये वास्तूशांतीच्या महाप्रसादातून विषबाधा

वास्तुशांती भोजनातून ४० जणांना विषबाधा, तीन बालकांचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायगड- वास्तुशांतीच्या भोजनातून विषबाधा होऊन ३ बालकांचा मृत्यू तर, ४० पेक्षा जास्त जण अत्यवस्थ झाल्याची घटना रायगड जिल्ह्यातील महाड या गावात घडली. सुभाष माने यांच्या घरी सोमवारी रात्री वास्तुशांतीनिमित्त स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. यात जेवण केल्यानंतर काही पाहुण्यांना अत्यवस्थ वाटू लागले. त्यांना उलटीही झाली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. 


त्यानंतर गावातील ५० जणांना उलट्या झाल्या. त्यात बालकांचा समावेश जास्त होता. स्थानिक रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून गंभीर असलेल्यांना तत्काळ रायगड, मुंबई आणि नवी मुंबईतील रुग्णालयांत हलवण्याच्या सूचना दिल्या. कल्याणी शिंगुडे (७), ऋषिकेश शिंदे (४१) आणि प्रगती शिंदे (१३) यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. दरम्यान, या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. 

 

पुढील स्लाइड्‍स क्लिक करून पाहा... संबंधित फोटो..

बातम्या आणखी आहेत...