आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृती‍दिन..प्रबोधनकार ठाकरेंच्या खोलीत 18 जणांच्या साक्षीने झाली होती ‘शिवसेने’ची स्थापना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका फोटात बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत छगन भुजबळ आणि मनोहर जोशी - Divya Marathi
एका फोटात बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत छगन भुजबळ आणि मनोहर जोशी

मुंबई- हिंदुहृदयसम्राट आणि शिवसेनेचे संस्‍थापक बाळासाहेब ठाकरे यांचा आज (शनिवारी) सहावा स्मृतिदिन. बाळासाहेबांना राज्यभरातून श्रद्धांजली अर्पण करण्‍यात येत आहे.  त्यानिमित्ताने आम्ही वाचकांना शिवसेनेच्या कारकिर्दीविषयी खास माहिती घेऊन आलो आहोत.

 

बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना केली होती. आजघडीला शिवसेनेला वगळून महाराष्‍ट्राच्‍या राजकारणाचा विचार करताच येत नाही. एवढा दबदबा शिवसेनेने राज्याच्या राजकारणात निर्माण केला आहे. 

 

स्थापना आणि इतिहास.....

- 19 जून 1966 रोजी प्रबोधनकार ठाकरे यांच्या खोलीत अवघ्या 18 जणांच्या उपस्थितीत नारळ फोडून शिवसेनेची स्थापना करण्यात आली होती. 
- महाराष्ट्रातील स्थानिक लोकांच्या अधिकारांसाठी लढा उभारण्यासाठी शिवसेनेची स्थापना करण्यात आली होती.
- शिवसेनेच्या स्थापनेच्या वेळी 'भूमिपुत्रांची संघटना' असा नारा बाळासाहेब ठाकरे यांनी दिला होता होता.
- ऐंशी टक्के समाजकारण, वीस टक्के राजकारण' असे म्हणत आधी राजकारणाला विरोध असलेल्या बाळासाहेबांनीही राजकारणात प्रवेश केला.
- 1970 च्या काळात शिवसेनेला अतिशय मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली.
- या दरम्यान परप्रांतीय लोकांवर विशेषत: दक्षिण भारतीय लोकांवर अनेक हल्ले झाले.
- परंतु, 1970 नंतर शिवसेनेचा 'भुमिपुत्रांची संघटना' हा नारा कमजोर पडू लागला.
- त्यानतंर बाळासाहेबांनी पक्षाला हिंदुत्वाचे स्वरूप दिले. शिवसेनेकडून हिंदुत्वाचे अनेक मुद्दे हाताळण्यात येऊ लागले.


पहिल्याच विधानसभा निवडणूकीत तब्बल 52 आमदार
- शिवसेनेने पहिली निवडणूक 1971 मध्ये लढवली, या निवडणुकीत त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही.
- 1889 च्या लोकसभा निवडणूकीत पहिल्यांदा शिवसेनेचा एक खासदार निवडून आला.
- 1990 मध्ये शिवसेनेने पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली. यात शिवसेनेचे तब्बल 52 आमदार निवडून आले.
- त्यानंतर 1989 मध्ये शिवसेनेने भाजपसोबत युती केली. ही युती 2014 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत कायम होती. 
- परंतु, 2014 ची विधानसभा निवडणूक दोन्ही पक्षांनी वेगवेगळी लढवली.
- कोकण आणि मुंबई हे शिवसेनेचे प्रभाव असलेले क्षेत्र मानले जाऊ लागले.
- परंतु, 2014 च्या निवडणूकीत शिवसेनेला या क्षेत्रात देखील पराभवाचा सामना करावा लागला.

 

उद्धव ठाकरेंनी नाकारले शिवसेनाप्रमुख पद....

- शिवसेनेत अध्यक्ष पदाऐवजी प्रमुख हे पद आहे. बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचे पहिले प्रमुख होते.
- त्यांचे निधन झाले तेव्हा हे पद त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले. परंतु, त्यांनी शिवसेना प्रमुख दुसरा होणार नाही, असे म्हणून शिवसेना पक्षप्रमुख असे नवे पद निर्माण केले आणि शिवसेनेची धुरा संभाळली.
- शिवसेनेची युवा संघटना देखील आहे. 'युवा सेना' असे या युवकांच्या संघटनेचे नाव आहे. उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे युवा सेनेचे प्रमुख आहेत.

 

दोन मुख्यमंत्री...

- सध्या शिवसेनेचे लोकसभेमध्ये 18 खासदार आहेत, तर राज्यसभेत तीन सदस्य आहेत.
- विधानसभेत शिवसेनेचे 63 आमदार आहेत, तर विधान परिषदेत 11 सदस्य आहेत.
- शिवसेनेचे नेते मनोहर जोशी आणि नारायन राणे यांनी मुंख्यमंत्री पदाची धुरा वाहिली आहे.
- शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ, मनोहर जोशी आणि अनंत गिते यानी केंद्रात मंत्रीपद भूषविले आहे.

बातम्या आणखी आहेत...