आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलग तिसऱ्या दिवशीच्या मुसळधार पावसाने मुंबईकरांची दाणादाण; ठाण्यालाही 'धुतले'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सलग तिसऱ्या दिवशी पडलेल्या मुसळधार पावसाने साेमवारी मुंबईकरांची अक्षरश: दाणादाण उडवली. रविवारी रात्रीपासून सुरू राहिलेल्या काेसळधारेने मुंबई अाणि उपनगरांना झाेडपून काढले. ठाण्यातही दमदार पावसाने हजेरी लावली. वसई, नालासाेपारा, विरार या भागात पूरजन्य स्थिती निर्माण हाेऊन अनेकांच्या घरात पाणी शिरले. ठिकठिकाणी साचलेले पाणी, वाहतूक काेंडी अाणि रेल्वेचा खाेळंबा यामुळे मुंबईकरांचे जीवन विस्कळीत झाले. दुपारनंतर पावसाचा जाेर अाेसरल्यामुळे थाेडाफार दिलासा मिळाला असला तरी अधूनमधून पावसाच्या जाेरदार सरी काेसळत हाेत्या.येत्या २४ तासांत अतिवृष्टीचा इशारा वेधशाळेने दिला आहे. रायगड भागात अनेक नद्यांनी धाेक्याची पातळी अाेलांडल्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात अाला अाहे. 


शनिवारी- रविवारी दणका दिल्यानंतर साेमवारी सकाळपासूनच पुन्हा जाेमाने सुरू झालेला पाऊस दुपारपर्यंत थांबण्याचे नाव घेत नव्हता. मुसळधार पावसाने ठाणे शहरात अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली कळवा, घाेडबंदर भागात अनेक इमारतींमध्ये पाणी शिरले. कळव्यातल्या सह्याद्री शाळेत नाल्याचे पाणी शिरल्यामुळे शाळेचा परिसर जलमय झाला हाेता. नवी मुंबई, कल्याण, डाेंबिवली भागातही माेठ्या प्रमाणावर पाणी साचले हाेते. सायन, माटुंगा, हिंदमाता, किंग सर्कल येथे गुडघाभर पाणी साचल्याने रस्ते जलमय झाले. त्यामुळे माेठ्या प्रमाणावर वाहतूक काेंडी झाली. पूर्व द्रुतगतीवर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याने वाहतूक मंदावली हाेती. ठाणे जिल्ह्यातील वसई, विरार, नालासाेपारा या भागाला नदीचे स्वरूप प्राप्त हाेऊन अनेक इमारतींच्या तळमजल्यात पाणी घुसले. 


परीक्षा तूर्त रद्द 
शिक्षणमंत्री विनाेद तावडे यांनी मुंबर्इतल्या शाळा अाणि महाविद्यालयांना सुटी जाहीर केली. रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने शिक्षणमंत्र्यांनी अगाेदरच सुटी जाहीर करायला हवी हाेती. सकाळच्या सत्रातील शाळा भरल्यानंतर उशिरा सुटी जाहीर केल्यामुळे शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली. पावसामुळे अनेक विद्यार्थी मुंबई विद्यापीठाच्या एमएस्सी सत्र २ व ४ च्या प्रात्यक्षिक परीक्षेस पाेहोचू शकले नाहीत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुन्हा घेण्याचे मुंबई विद्यापीठाने साेमवारी जाहीर केले. 


तुळशी तलाव अाधीच अाेव्हरफ्लाे
तुळशी तलाव साेमवारी सकाळपासूनच अाेसंडून वाहू लागला. या तलावाची पाणी साठवण्याची क्षमता १३९.१७ मीटर असून ही पातळी तलावाने साेमवारी गाठली. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही तलाव क्षेत्रात चांगला पाऊस पडत अाहे. 


नद्यांनी धाेक्याची पातळी अाेलांडली
सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे साेमवारी रायगड जिल्ह्यातील अनेक नद्यांनी धाेक्याची पातळी अाेलांडली, महाबळेश्वरला झालेल्या २०१ मि.मी. पावसामुळे सावित्री नदीचे पाणी महाड शहरात घुसल्यामुळे पूरजन्य स्थिती निर्माण झाली अाहे. 


वसईत सर्वाधिक पाऊस
सर्वाधिक पावसाची नोंद पालघर जिल्ह्यातील वसई तालुका येथे २३२.५० मि.मी. झाली आहे. त्याचबराेबर मुंबई शहर-१७०.६० मि.मी., मुंबई उपनगर-१२२ मि.मी., ठाणे-७४.७६ मि.मी., पालघर-५५.८३ मि.मी, रायगड-११३.५३मि.मी., पावसाची नाेंद झाली. 


लाेकल, बससेवा विस्कळीत 
सकाळी पावसाचा जाेर असल्यामुळे लाेकल, बस वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला. कळवा, ठाणे स्थानकात सकाळी रुळावर गुडघाभर पाणी साचले हाेते. सायन अाणि दादर दरम्यान रेल्वे रुळावर माेठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिराने हाेत हाेती. नालासाेपारा स्थानकात माेठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे सकाळी मुंबर्इत येणाऱ्या लांबपल्ल्याच्या गाड्या वणगाव, बाेर्इसर, पालघर, केळवे राेड स्थानकांवर अडकून पडल्या हाेत्या. 

बातम्या आणखी आहेत...