आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Shocking : मुंबईत तीन वर्षांमध्ये तब्बल 32 हजार नागरिक बेपत्ता, सापडले 27 हजारच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राजधानी मुंबईमध्ये २०१४, २०१५ आणि २०१६ या तीन वर्षांमध्ये तब्बल ३२ हजार ५९८ नागरिक बेपत्ता झाले आहेत. त्यापैकी २७ हजार ५६५ जण सापडले. मात्र, ५ हजार ३३ जणांचा अद्याप काहीच थांगपत्ता नाही. मुंबईच्या गुन्हे शाखा पोलिसांनी एका माहिती अधिकाराच्या अर्जाच्या उत्तरात हा खुलासा केला आहे. सामाजिक कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी ही माहिती मागितली होती. माहिती अधिकारात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता झालेल्यांपैकी ११८ जणांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे.

 

धक्कादायक बाब म्हणजे, बेपत्ता नागरिकांपैकी निम्मे हे १६ ते २५ वर्षे वयोगटातील आहेत. त्यानंतर २६ ते ४० वयोगटातील बेपत्ता लोकांची संख्या जास्त आहे. २०१४ मध्ये १०,९१६, २०१५ मध्ये १०,३१३ आणि २०१६ मध्ये ११,३६९ जण बेपत्ता झाले आहेत. विशेष म्हणजे बेपत्ता होणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने लक्षणीय वाढ झाली आहे. या तीन वर्षांत १६ ते २५ वर्षे या वयोगटातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त व्यक्तींचा समावेश आहे. 


सामाजिक कार्यकर्ते विजय वैद्य हे बेपत्ता लोकांना शोधण्यासाठी पोलिसांना मदत करत आहेत. तरुण वयातील मंडळी सारासार विचार न करता भावनेच्या भरात घर सोडून जातात, असेे त्यांनी सांगितले.  

 

बेपत्ता होण्याची कारणे  
- परीक्षेत चांगले गुण न मिळाल्याने घरून पलायन  
- चित्रपटसृष्टीच्या आकर्षणामुळे घर सोडणे  
- मनमर्जीने हवे तसे जगण्यासाठी  
- क्षणिक राग किंवा भावनेच्या भरात घेतलेला निर्णय

 

बातम्या आणखी आहेत...