आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Mumbai नाही तर महाराष्ट्रातील या शहरात देशातील सर्वात महाग पेट्रोल-डिझेल, लवकरच गाठणार शंभरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात सुरू झालेली भाववाढ थांबण्याचं नाव घेत नाही. देशभरात पेट्रोल, डिझेलच्या दरात विक्रम वाढ पाहायला मिळत आहे. लवकरच पेट्रोलचे दर शंभर रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. मुंबईत देशातील सर्वात महाग पेट्रोल-डिझेल विकले जात असल्याचे समोर आले होते पण मुंबई नाही तर महाराष्ट्रातीलच अमरावतीत देशातील सर्वात महाग पेट्रोल-डिझेल आहे. अमरावतीत पेट्रोलचा दर 86.18 रुपये तर डिझेलचा 73.98 रुपये प्रतिलीटर इतका आहे. 

 

मुंबईत पेट्रोलचे दर 84. 99 रुपये आहेत तर डिझेल 72.76 रुपये लीटर रुपये आहे. सिंधुदुर्गात एक लिटर पेट्रोलसाठी 85.84 रुपये तर डिझेलसाठी 72.50 रुपये द्यावे लागत आहेत औरंगाबादमध्ये पेट्रोल 85.97 रुपये तर डिझेल 73.75 रुपये आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचे दर प्रतिलिटर 85.07 रुपये तर डिझेलसाठी 71.66 रुपये मोजावे लागत आहेत. 

 

कर्नाटक निवडणुकीमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले होते. परंतु, निवडणूक निकालानंतर आता पुन्हा दरवाढ सुरु झाली आहे. गेल्या सलग नऊ दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत असून, त्यामुळं नागरिकांचा खिसा रिकामा होत आहे. यामुळे सरकारला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. पेट्रोल -डिझेलच्या किमती कमी करण्यासाठी सरकारने हालचाली सुरु केल्याची सूत्रांकडून मिळत आहे. 

बातम्या आणखी आहेत...