आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणांनो प्रेम..प्रेम..काय करता? अण्णा हजारेंचे देशप्रेम पाहा; करणार होते आत्महत्या!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फेब्रुवारी महिना सुरू होताच तरुणाईला वेध लागतात ते 14 तारखेचे अर्थात 'व्हॅलेंटाइन डे'चे. आज 'व्हॅलेंटाइन डे'. गर्लफ्रेंड-ब्वॉयफ्रेंड एका दुसऱ्याला गिफ्ट देतात आणि प्रेम व्यक्त करतात. प्रेम अशी भावना आहे की, ज्यामुळेच आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त झाला आहे. मग हे प्रेम एखाद्या व्यक्ती-व्यक्तीमधील असो, व्यक्ती-वस्तूमधील असो वा व्यक्ती आणि समाजकार्यासोबत असो ते नि:स्वार्थ आणि निस्सीम असते. एक अशी व्यक्ती की, त्यांनी अविवाहित राहून समाजातील तळागाळातील व्यक्तीवर प्रेम केले, समाजसेवेप्रति आपले सर्वस्व अर्पण केले. देशाला माहिती अधिकार, भ्रष्टाचारविरोधी कायदा, लोकपाल कायदा देऊन जगासमोर मोठा आदर्श निर्माण केला, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्‍णा हजारे यांची माहिती घेऊन आलो आहे.

 

अण्णा हजारे सांगतात की, 'कुठल्याही फळाची अपेक्षा न करता काम करत राहावे. लोक नक्की तुमच्यासोबत काम करतील. अनेक लोक असे आहेत की, ज्यांच्या कामामध्ये सातत्य आहे. मात्र, हे सातत्य आणि निष्ठा केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी आहे. अशा लोकांना दररोज घेतल्याशिवाय गोळी झोप लागत नाही. व्यक्तीचे विचार, आचार, त्याग यासारखे गुण त्याची विशेष ओळख बनवतात. या गुणांना जर नेतृत्त्वाची जोड मिळाली तर अशा व्यक्तिमत्त्वांना समाज स्वीकारतो.'

 

अहमदनगर जिल्ह्यातील राळेगण सिद्धी आणि 81 वर्षीय युवा अण्णा हजारे. हे दोघे एकमेकांचे आता पर्याय बनले आहेत. राळेगण सिद्धी गावाचे नव्या रुपड्याची कल्पना अण्णा हजारेंशिवाय करताच येऊ शकत नाही. अविवाहित राहून गावातील लोकांची सेवा करणे, हेच त्यांचे स्वप्न त्यांनी सत्यात उतरवले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा... आत्महत्या करणार होते अण्णा... लष्करात 15 वर्षे नोकरी करुन अविवाहीत राहून स्विकारले समाजसेवेचे व्रत... 

बातम्या आणखी आहेत...