आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • INVESTGATION: भय्यू महाराज आत्महत्या प्रकरण: मुंबई पुण्यापर्यंत पोहोचली संशयाची सुई Bhayyu Maharaj Suicide Issue Servants Were Merchant Of Disputed Land

INVESTIGATION: भय्यू महाराज आत्महत्या: मुंबई-पुण्यापर्यंत पोहोचली संशयाची सुई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/इंदूर- आध्यात्मिक गुरू भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. मध्य प्रदेश पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु केली आहे. विशेष म्हणजे संशयाची सुई आणि मुंबई-पुण्यापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

जे सेवादार, बांधकाम व्यावसा‍यिक भय्यू महाराजांना वारंवार फोन करत होते, ते आता संशयाच्या भोवर्‍यात सापडण्याची शक्यता आहे. जमीन आणि स्टॅम्प हेराफेरीचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे या प्रकरणाची पो‍लिस महासंचालकद्वारा गोपनीय चौकशी केली जात आहे.

 

50 वर्षीय भय्यू महाराज यांच्या आत्महत्येमागे कौंटुबिक वाद असल्याचे सांगितले जात असले तरी पडद्यामागे वेगळेच रहस्य लपले आहे. भय्यू महाराजांच्या काही सेवेकरी रियल इस्टेट आणि जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करत होते. वादग्रस्त जमीन ते स्वस्त दरात उपलब्ध करून देत होते. काही दिवसांपूर्वी भय्यू महाराज यांच्या सांगण्यावरून मुंबईतील चिटफंड व्यावसायिक महिलेने बैतूलमध्ये (मध्य प्रदेश) कोट्यवधींची जमीन खरेदी केली होती. या व्यवहारात मुंबईतील एका बड्या बांधकाम व्यवसायिक आणि पुण्यातील सेवेकरीची महत्त्वपूर्ण भूमिका होती. 

 

जमिनीच्या रजिस्ट्रीत स्टॅम्पमध्ये मोठी हेराफेरी झाल्याचा आरोप ज‍मीन खरीददार महिलेने केला आहे. संबंधित महिलेने आपल्या संस्थेतील कर्मचारी विलास आर. रासम (रा.हनुमान मंदिराजवळ, सोपरा गाव, ठाणे) याच्याद्वारे मध्य प्रदेशचे पोलिस महासंचालक ऋषिकुमार शुक्ला यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे. या गैरव्यवहारात बड्या लोकांचा हात असल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. प्रकरण हाय प्रोफाइल असल्याने ऋषिकुमार शुक्ला यांनी चौकशीसाठी विशेष तपास पथक नेमले आहे. गैरव्यवहाराची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात आली आहे. सीबीआयने तक्रारदार आणि आरोपींना नोटीस बजावून चौकशीसाठी बोलावले आहे. संबंधित महिलेची कोट्यवधी रुपये विदेशात अडकले असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली आहे. भय्यू महाराज यांनी महिलेला या कामात मदत केल्याची माहिती समोर आली आहे.

 

फोन आल्यानंतर अस्वस्थ व्हायचे भय्यू महाराज...
बांधकाम व्यावसायिकांचा फोन आल्यानंतर भय्यू महाराज अस्वस्थ व्हायचे, अशी माहिती पोलिस चौकशीत समोर आली आहे. भय्यू महाराजांच्या मोबाइलचे कॉल डिटेल आणि त्याच्या संभाषणाचे विवरण तपासले जात आहे. भय्यू महाराज यांना मुंबईतील 'त्या' बांधकाम व्यावसायिकाचे आणि पुण्यातील 'त्या' सेवेकर्‍याचे सलग फोन येत होते, अशी माहिती समोर आली आहे. भय्यू महाराज कधी वॉशरूम तर कधी बंद कारमध्ये त्यांच्याशी संवाद साधत होते.

 

बातम्या आणखी आहेत...