आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारला जाग; धर्मा पाटलांना आधी होती 4.36 लाखांची भरपाई, आता 54 लाख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- मंत्रालयात आत्महत्या करणारे शेतकरी धर्मा पाटील यांच्या वारसांना नवीन भूसंपादन, मनरेगा, सानुग्रह अनुदानातून आता ५४ लाखांचा मोबदला मिळेल. विखरण येथे भूसंपादन झाले त्यावेळी धर्मा पाटलांना हेक्टरी २.१८ लाखाप्रमाणे ४ लाख ३६ हजार रुपये मिळणार हाेते. सुधारित मोबदल्याचा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आला आहे.  धर्मा व मुलगा नरेंद्र यांच्या शेतातील ६४८ फळझाडांचे फेरमुल्यांकन करण्यात अाले. त्यानुसार अाकारलेली रक्कम व त्यावर १००% दिलासा अशी दुप्पट रक्कम मिळून फळझाडांपाेटी ५ लाख ८३ हजार रुपये आणि नवीन भूसंपादन कायदा व मनरेगातील तरतुदीनूसार जमिनीचे मूल्यांकन व सानुग्रह अनुदानापोटी ४८ लाख ५९,७५४ रुपयांचा वाढीव मोबदला मिळेल. आधीसह एकूण रक्कम ५४ लाख ४८,१३२ रुपये होईल. 

 

 

प्रतिएकर ६ लाख सानुग्रह अनुदान
प्रतिएकर सहा लाख रुपये सानुग्रह अनुदान निश्चित झाले. विखरण येथील वीज प्रकल्पातील अन्य बाधित शेतकऱ्यांना देखील या नवीन बदलानुसारच लाभ मिळणार अाहे. तशी तरतूद करून िजल्हाधिकाऱ्यांनी अहवाल मंत्रालयात पाठवला अाहे.

 

आधीचे पंचनामे रद्द
धर्मा पाटील व नरेंद्र पाटील यांच्या जमिनीचे नवीन भूसंपादन कायद्यानुसार फेरमूल्यांकन झाले. अधिकाऱ्यांनी केलेले यापूर्वीचे पंचनामे रद्द झाले. धर्मा पाटील यांनी केलेला पंचनामा िजल्हाधिकाऱ्यांनी ग्राह्य ठरवला. सानुग्रह अनुदान गणना फेब्रुवारीच्या अहवालानुसार नव्याने झाली.

 

कशामुळे दिला वाढीव माेबदला 
१) धर्मा पाटील व भूसंपादन कायद्याचे तीन निवाडे आणि अन्य शेतकऱ्यांच्या जमिनीची वर्गवारी पाहून व कागदपत्रांची पडताळणी करुन सानुग्रह अनुदान निश्चित केले. 
२) जिरायत, हंगामी बागायत व बागायत जमिनीची तपासणी केली. त्यातून सानुग्रह अनुदानात बदल झाला. 
३) सरकारी परिगणनेचे सगळे तक्ते रद्द करण्यात अाले. उर्जामंत्र्यांनी दिलेल्या सूचनांनुसार धर्मा पाटील यांचा पंचनामा ग्राह्य धरण्यात अाला. 

 

असे मोबदल्याचे गणित 
१) मनरेगा कायद्यातील तरतुदीनुसार शेतकऱ्यांना पंचनाम्यात नमूद केलेल्या राेपांच्या संख्येप्रमाणे सानुग्रह अनुदान देण्याचा प्रस्ताव सादर केला. 
२) िजल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी ६ फेब्रुवारीला नव्याने अहवाल दिला. यापूर्वीची परिगणना रद्द केले.
३) राेपांचे मूल्य अाकारून त्यावर १००% दिलासा रक्कम दिली. त्यामुळे ही रक्कम दुप्पट झाली.  नमूद राेपांच्या अस्तित्वानुसार जमीन हंगामी बागायत दाखविण्यात अाली. 

 

- २०१२ मधील भूसंपादनामुळे निवाड्यात कमी दर मिळाला. धर्मा पाटलांच्या मृत्यूनंतर मंत्र्यांनी नवीन भूसंपादन कायद्यानुसार रक्कम अाकारणीचे अादेश दिले.

- नवा भूसंपादन कायदा व मनरेगा कायद्यातील तरतुदीमुळे फेरमुल्यांकन करण्यात आले. त्यात ही रक्कम वाढली.

- जुन्या दरानुसार जमिनीला एकूण ४,३८ लाख मोबदला मिळणार हाता अाता तो ५४.४८ लाख मिळेल. यात फळझाडांपाेटी ५.८८ लाख रक्कम अाकारली अाहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा... काय आहे हे प्रकरण...?

बातम्या आणखी आहेत...