आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा हरवते मुकेश अंबानींच्या कारची किल्ली, ड्युप्लिकेट किल्ली घेऊन जर्मनीहून आले हेलिकॉप्टर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तिमत्त्व अर्थात रिलायन्स उद्योग समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा आज (19 एप्रिल) 61 वा वाढदिवस. मुकेश अंबानी यांनी व्यावसायिक प्रगतीमुळे देशाच नव्हेत तर आंतरराष्‍ट्रीय स्तरावर किर्ती मिळवली आहे.

 

मुकेश अंबानी भारताचे सर्वात श्रीमंत बिझनेसमन आहेत. त्यांच्या प्रतिष्ठेशी निगडित एक असा किस्सा आहे की, त्यांच्या कारची किल्ली सापडत नव्हती, तेव्हा त्याची ड्युप्लिकेट किल्ली देण्यासाठी जर्मनीतून हेलिकॉप्टर आले होते.

 

# अशी आहे प्रतिष्ठा
मुकेश अंबानी एका दिवशी आपल्या कार्यालयात जाण्यासाठी मुंबईतील आपले घर एंटीलियाच्या पार्किंगमध्ये पोहोचले. आपल्या आवडत्या मर्सिडीझ कारची किल्ली काढण्यासाठी जेव्हा त्यांनी खिशात हात घातला तेव्हा किल्ली मिळाली नाही. 27 मजल्यांच्या भव्यदिव्य घरात किल्लीचा शोध घेण्यात आला, परंतु न मिळाल्याने अंबानी दुसऱ्या कारने ऑफिसला जातात. यानंतर अंबानींचा IIM पासआऊट जनरल मॅनेजर मर्सिडीझच्या ऑफिसमध्ये फोन करतो. पहाटे 3 पर्यंत एक हेलिकॉप्टर एंटीलियाच्या टॉप फ्लोअरवर लँड होते. त्यात जर्मनीहून आलेला मर्सिडीझचा ऑफिसर बसलेला असतो, जो अंबानींच्या स्टाफला डुप्लिकेट किल्ली सोपवतो आणि परत जर्मनीला निघून जातो.

 

# अंबानींचे कार कलेक्शन
नेमके हे स्पष्ट नाही की, मुकेश अंबानींकडे किती कार्स आहेत, परंतु देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या घरात 6 मजले फक्त पार्किंगसाठी बनलेले आहेत. यात 20 - 50 नाही तर तब्बल 168 कार ठेवता येतात. मीडियामध्ये आलेल्या काही रिपोर्टनुसार, त्यांच्याकडे 150 हून जास्त कार आहेत, म्हणूनच त्यांनी एवढा मोठा पार्किंग स्पेस बनवलेला आहे. मुकेश अंबानींच्या प्रमुख कार्समध्ये Maybach 62, Mercedes S class, Bentley Flying Spur, Rolls Royce Phantom आणि ब्लॅक Mercedes SL500 सामील आहेत.

 

#Mercedes S600 Guard वर नाही होत विस्फोटांचा परिणाम..
ही कार सुरक्षा मानकांमध्ये वीआर9 लेव्हलची आहे. सुरक्षेच्या बाबतीत ही सर्वात वरची पातळी मानली जाते. ही बुलेटप्रूफ तर आहेच, यावर विस्फोटांचा परिणामही होत नाही. या कारला कंपनीच्या जर्मनीतील प्लांटमध्ये बनवण्यात आले आहे. अभिनेता आमिर खानकडेही 2014 मॉडलची ही कार आहे. तसे पाहिले तर, या कारची मागणी पूर्ण जगभरात वाढत आहे. सूत्रांनुसार, एस600 खरेदी करणाऱ्यांमध्ये रिलायंस इंडस्ट्रीजची वेटिंग 57व्या क्रमांकावर होती. त्यांना या कारसाठी तब्बल 8 महिने प्रतीक्षा करावी लागली.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा... # Mercedes S600 Guard चे फीचर्स

बातम्या आणखी आहेत...