आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकनाथ खडसेंना फसविण्याचा अंजली दमानिया यांचा पूर्व नियोजित कट, कल्पना इनामदार यांचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबर्इ- भोसरी एमआायडीसी जमीन घोटाळ्याप्रकरणी मंत्रिपदावरून पाय उतार व्हावे लागलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना या प्रकरणात गोवण्याचा पूर्व नियोजित कट होता असा आरोप अण्णा हजारे यांच्या आंदोलनातील कोअर कमिटीच्या सदस्या कल्पना इनामदार यांनी बुधवारी केला आहे.

 

इनामदार यांनी सांगितले की, खडसे मंत्री झाल्यानंतर अंजली दमानिया यांचे पती अनिश यांनी मेव्हणे आणि दमानिया यांचे भाऊ कृष्णकांत मालप यांना सांगून मला त्यांच्या घरी बोलावले होते. त्यावेळी खडसे आणि अजित पवार यांच्याबाबत दुपारी साडेतीन तास चर्चा झाली. ही चर्चा झाल्यानंतर आपल्याला खडसेंना अडकवायचे आहे. त्यासाठी मी तुम्हाला पैसे देते, असे मला अंजली दमानिया यांनी सांगितले. काही पत्र मी तुम्हाला देते ती घेऊन तुम्ही खडसे यांच्या ऑफिसला जा आणि त्यावेळी मी दिलेले पैसे खडसे यांच्या टेबलावर ठेवा. त्यानंतर मी मागून लगेच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला घेऊन येते, असे मला सांगितले. मालप आणि माझी ओळख असल्याने मी त्यांचे हे काम करेन, असे त्यांना वाटले. पण त्यावेळी मी त्यांना यासाठी स्पष्ट नकार दिला. मी याची कुठेही वाच्यता करू नये, यासाठी मला भुजबळांनी धमकी देण्यासाठी पाठवले, असे माझ्यावर खोटे आरोप केले. परंतु भुजबळांशी माझा कोणताही संबंध नाही, असे इनामदार यांनी यावेळी स्पष्ट केले.

 
पुरया गोष्टी घडल्या त्यावेळी माझ्याकडे काही पुरावे नव्हते. परंतु मी धमकी दिली असे दमानिया यांना वाटत होते तर त्यांनी पोलिसात तक्रार का केली नाही. त्याचप्रमाणे त्यांच्या घरातल्या कॅमेऱ्यात हे सर्व कैद झाले आहे. मी धमकी दिली असेल तर तो पुरावा त्यांनी पत्रकारांपुढे सादर करावा. अंजली दमानिया यांच्याकडून माझी वारंवार बदनामी होत आहे.

 

अगोदर अडीच वर्षा अगोदर केली आणि आता पुन्हा अण्णांच्या आंदोनात माझी पार्श्वभूमी खराब असून भुजबळांबरोबर संबंध असल्याचा आरोप केला. माझी पार्श्वभूमी खराब आहे असे त्या वारंवार सांगत असतील तर त्याबाबतचे कागदपत्र माध्यमांसमोर सादर करावे अन्यथा माझी माफी मागावी. या संदर्भात दमानिया यांना नोटीस पाठविण्यात आली असून माफी न मागितल्यास त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे इनामदार यांनी सांगितले.

आंदोलनात शेतकरी उभे केले मग मंचावर शेतकरी नेते का नव्हते असा असा प्रश्न केल्यावर माझ्या हातून मार्इक काढून मला धक्काबुक्की करून बाहेर काढण्यात आले. माझा संघाशी संबंध जोडून माझी बदनामी होर्इल आणि अण्णा मला त्यांच्यापासून दूर कसे करतील असा प्रयत्न सुकाणू समितीमधील काही राजकीय मंडळींनी केला. कोणतेही पुरावे नसताना त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत. ज्या ज्या लोकांनी माझ्यावर खोटे आरोप करून बदनामी केली त्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात बदनामीचा खटला दाखल करण्यात येणार असल्याचे कल्पना इनामदार यांनी यावेळी सांगितले.

 

खडसेंच्या सांगण्यानुसार अाराेप
भुजबळांची केस मागे घ्या त्यासाठी तुम्हाला हवे ते देईन असे इनामदार मला म्हणाल्या हाेत्या. त्यानंतर त्यांना अण्णांच्या अांदाेनात बघून मला धक्का बसला.  अाता खडसेंच्या सांगण्यावरून त्यांनी इनामदार यांनी हे अाराेप केलेत.
- अंजली दमानिया

 

 

बातम्या आणखी आहेत...