आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवेंद्र फडणवीसांवर तब्बल 22 गुन्हे; देशात ठरले सर्वाधिक गुन्हे असलेले मुख्यमंत्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देशात सर्वाधिक गुन्हे दाखल असलेले मुख्यमंत्री ठरले आहेत. 'असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स' (एडीआर) या संस्थेने देशातील 29 राज्यांचे मुख्यमंत्री आणि दोन केंद्रशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांवरील गुन्हे आणि संपत्तीबाबतचा एक अहवाल प्रकाशित केला आहे.

 

निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार एडीआरने हा अहवाल दिला आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्यावर तब्बल 22 गुन्हे दाखल असून त्यापैकी तीन गंभीर स्वरुपाचे आहेत.

 

दुसर्‍या क्रमांकावर केरळचे पिनाराई विजयन..
केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याविरोधात एकूण 11 गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारीच्या बाबतीत ते दुसऱ्या क्रमांकावर असून  तिसऱ्या क्रमांकावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आहे. केजरीवाल यांच्याविरोधात तीन खटले दाखल आहेत.

बातम्या आणखी आहेत...