आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी बाणा..शीतल महाजन यांची नऊवारी साडीत 13 हजार फूट उंचावरून जम्प

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भारतीय स्काय डायव्हर आणि पद्मश्री शीतल महाजन यांनी थायलंडमध्ये नऊवारी साडी नेसून 13 हजार फूट उंचावरून विमानातून पॅरा जम्प करून मराठी संस्कृतीचे दर्शन घडवत विक्रम प्रस्थापित केला आहे. शीतल यांनी हा विक्रम करण्याची काल (रविवारी) पूर्ण तयारी केली होती. परंतु, खराब हवामानामुळे त्यांना 10 हजार फुटांवरूनच माघारी फिरावे लागले होते.

 

पॅरा जंपर साहसी खेळात उत्तुंग भरारी घेत पद्मश्री शीतल महाजन यांनी स्काय डायव्हिंग या साहसी खेळात 17 राष्ट्रीय व 6 जागतिक विक्रम करून भारतीय पहिला महिला असल्याचा मान मिळविला आहे. महाराष्ट्राची शान असलेली शीतल महाजन यावेळी मराठी असल्याचा सार्थ अभिमान मनामध्ये घेऊन आपल्या मराठी संस्कृतीचे जतन राहावे. तसेच मराठी बाणा कायम रहावा याकरिता आता पर्यंत जगामध्ये कुणीच असा धाडस केला नसल्याने पहिल्यांदाच महाराष्ट्राची संस्कृती महिलांची नऊवारी साडीचा पेहराव म्हणजे चक्क नऊवारी साडी नेसून विमानातून जम्प केली आहे.

 

थायलंड देशामध्ये स्काय डायव्हिंग सेंटर येथे 13 हजार फुटावरून आज (सोमवार) रोजी नऊवारी साडी नेसून जम्प केली आहे.

 

शीतल महाजन बहिणाबाई चौधरी यांची पणती
शीतल महाजन यांचा जन्म पुण्यात झाला असून त्या मूळजे गाव जळगाव आहे. आद्य कवियत्री बहिणाबाई चौधरी यांच्या त्या पणती आहेत. बहिणाबाई चौधरीचे नातू कमलाकर महाजन यांची सुकन्या. बालपणापासूनच शीतलला काहीतरी नवे करण्याचा ध्यास होता. यातच तिला पॅराशूट जम्पिंगची आवड निर्माण झाली. 2004 पासून ह्या स्कायडायव्हिंग (पॅराशुट जंम्पिग) या खेळात जागतिक स्पर्धेत आणि जागतिक विक्रमामध्ये भारत देशाचे प्रतिनिधित्व करत आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... शीतल महाजन यांचा 13 हजार फुटावरील स्काय डायव्हींगचा व्हिडिओ आणि फोटो...

बातम्या आणखी आहेत...