आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Facebook वर लाखों प्रेमीयुगुलांची भेट घडवून आणणार्‍या मार्क झुकरबर्गची अशी आहे लव्हस्टोरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल नेटवर्किंग वेबसाइट 'फेसबुक'वर लाखों प्रेमीयुगुलांची भेट घडवून आणणार्‍या मार्क झुकरबर्गची लव्हस्टोरी त्याच्यासारखीच 'हटके' आहे. झुकरबर्ग 12 वर्षांपूर्वी पहिल्यादा त्याची जीवनसाथी प्रिशिला हिला भेटला होता. पहिल्या भेटीतची प्रिशिलावर झुकरबर्गला जीव जडला होता. 'व्हॅलेंटाइन वीक'निमित्त आम्ही नवी सीरिज सुरु केली असून यात 'देशातील टॉप बिझनेसम व सीईओंच्या 'लव्हस्टोरी' आपल्यासाठी घेऊन आहे.

 

वॉशरुम बाहेर अचानक भेटले होते हे प्रेमीयुगुल...

ही गोष्टी आहे 12 वर्षांपूर्वीची. मार्क झुकरबर्ग आणि प्रिशिला हार्वर्ड युनिव्हर्सिटीत शिक्षण घेत होते. दोघे 2003 मध्ये एका पार्टीत सहभागी झाले होते. झुकरबर्ग वॉशरूमबाहेर उभा होता. तितक्यात त्याचे लक्ष रांगेत उभ्या असलेल्या एका युवतीकडे गेले. ती युवती म्हणजेच प्रिशिला चान. कदाचित परमेश्वराला या प्रेमीयुगुलाची भेट वॉशरुमबाहेरच घडवून आणायची असावा.

झुकरबर्ग व प्रिशिलाचे हाय- हॅलो झाले. हळूहळू दोघांत चांगली गट्टी जमली. दोघे दररोज भेटू लागले. मैत्री अन् मैत्रीचे रुपांतर प्रेमात कसे झाले, हे दोघांनीही कळले नाही. दोघांनी 19 मे 2012 ला विवाह केला.

 

पुढील स्लाइडवर वाचा, प्रिशिला 'फेसबुक'ची पहिली यूजर

बातम्या आणखी आहेत...