आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदित्य ठाकरेंसोबत कोण आहे ही तरुणी; कॅमेर्‍यापासून वाचण्यासाठी असा चक्क झाकला चेहरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- फिल्म मिर्जियाची एक्ट्रेस संयमी खेर आणि शिवसेनाच्या युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या फ्रेंडशिपची सध्या सोशल मीडियावर खमंग चर्चा सुरु आहे. दोघांना वांद्ये येथील एका रेस्तराँमध्ये स्पॉट करण्यात आले. दरम्यान, संयमी सध्या चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात आहे.

 

आदित्य यांनी कॅमेर्‍यापासून वाचण्यासाठी असा झाकला चेहरा...

- सोशल मीडियावर आदित्य आणि संयमी यांचे फोटोज व्हायरल झाले आहेत. एका रेस्टराँच्या बाहेर कारमध्ये आदित्य ठाकरे आणि संयमी सोबत दिसते. कॅमेर्‍यापासून वाचण्यासाठी आदित्य यांनी स्वत:चा चेहरा झाकून घेतल्याचे दिसत आहे.  
- मीडियाच्या कॅमेर्‍यात कैद झाल्यानंतरही आदित्य आणि संयमी खेरकडून त्यांच्या फ्रेंडशिपबाबत अद्याप कोणतेही वक्तव्य समोर आले नाही. परंतु, सोशल मीडियात या जोडीवरून उलटसूलट चर्चा सुरु झाली आहे.

 

कोण आहे संयमी खेर?
- संयमी खेर ही उषा किरण यांची नात आहे. तिने हिंदी आणि मराठी फिल्म इंडस्ट्रीत काम केले आहे.
- संयमी आणि आदित्य यांचे कुटुंब आधीपासून चांगले परिचित आहेत.
- संयमीने राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा सिनेमा 'मिर्जिया’मध्ये हर्षवर्धन कपूरसोबत फिल्मी करिअरला सुरुवात केली. सध्या ती चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात आहे.

 

असा सुरु झाला 'लव्ह मुंबई' उपक्रम...
- आदित्य यांनी मागील वर्षी एक खास उपक्रम सुरु केला होता. वांद्ये येथील समुद्र किनार्‍यावर लाकडापासून बनवले 'लव्ह मुंबई' जनतेसाठी स्थापित केले होते.
 - शहराच्या सौंदर्यात वा होण्याच्या उद्देशातून 'लव्ह मुंबई' स्थापित करण्‍यात आले आहे. प्रोमिनेड एपी थिएटरजवळ स्थापित करण्‍यात आलेल्या 'लव्ह मुंबई'चा लोगो 20 फूट लांब आणि 7 फूट उंच आहे.

 

अशी आहे आदित्य ठाकरेंची पर्सनल लाइफ
- 13 जून 1990 रोजी मुंबईमध्ये आदित्य यांचा जन्म झाला.
- कविता तसेच गीत लिहिण्याचा त्यांनी छंद जोपासला आहे.
- आदित्य यांचा "My thoughts in white and black” हा कविता संग्रह 2007 मध्ये प्रकाशित झाला होता.
- याशिवाय त्यांनी लिहिलेल्या गीतांचा अल्बम 'उम्मीद' देखील लॉन्च झाला आहे.
- स्टाइल आयकॉन म्हणूनही आदित्य यांची ओळख आहे. त्याने मॉडल्ससारखे फोटोशूट केले आहे.

 

आदित्य यांचे बॉलिवुड कनेक्शन
- आदित्य ठाकरे यांचे बॉलिवूडमध्ये खूपसारे मित्र आहे. बॉलिवूडमधील अनेक इव्हेंटला ते हजेरी लावतात.
- ऋतिक रोशन, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीजचा त्यांच्या फ्रेंड लिस्टमध्ये समावेश आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... सोशल मीडियावर व्हायरल झालेले आदित्य आणि संंयमीचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...