आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी कर्जमाफीत 'अोटीएस'ची मर्यादा १.७५ लाखांवर नेणार : रावते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय घेताना राज्य सरकारने 'वन टाइम सेटलमेंट'ची (अाेटीएस) मर्यादा दीड लाखापर्यंत ठेवली हाेती. मात्र त्यावरील रक्कम भरण्यास शेतकरी असमर्थ ठरत असल्यामुळे अाता मर्यादा पावणेदाेन लाखांपर्यंत वाढवण्याची सूचना मी मुख्यमंत्र्यांना केली अाहे. याबाबत धाेरणात्मक निर्णयही झाला असून लवकरच अादेश काढण्यात येईल, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी पत्रकारांना दिली. 


'अाेटीएस'साठी सध्या एका कुटुंबात पती- पत्नीच्या नावावर वेगवेगळे कर्ज असले तरी त्याची एकूण मर्यादा दीड लाखापर्यंतच अाहे. ती प्रत्येकी दीड लाखापर्यंत म्हणजे एकूण तीन लाख करण्यात येणार असल्याचेही रावते म्हणाले. 


औरंगाबाद जिल्ह्यात बँक ऑफ महाराष्ट्रचे दीड लाखापेक्षा जास्त कर्ज घेतलेले २२ हजार कर्जदार असून त्यापैकी केवळ ८०० जणांनीच 'अाेटीएस'चा फायदा घेतला. दिवाकर रावते यांनी, या बँकांनी अापला एनपीए कमी करण्यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या नावावर पावणेदोन लाखांपर्यंत पीक कर्ज अाहे, त्यांचे २५ हजार रुपये माफ करावेत, अशी सूचना केली. 


पती-पत्नीच्या कर्जमाफीबाबत संभ्रम 
मंत्री रावते यांनी बैठकीत शेतकरी पती-पत्नी या दाेघांनाही प्रत्येकी दीड लाखापर्यंत 'अाेटीएस' लाभ देण्याविषयी निर्णय झाला असल्याचे रावतेंनी अधिकाऱ्यांना सांगितले. मात्र बँक अधिकाऱ्यांनी असा निर्णय अद्याप बँकेत अाला नसल्याचे सांगितले. त्यावर रावतेंनी सचिवांकडे फाेनवर विचारणा केली. अध्यादेशच अद्याप निघाला नसल्याचे त्यांना सांगण्यात अाले. 

बातम्या आणखी आहेत...