आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Maha Budget सामाजिक कल्याणार्थ: आर्थिक मागास, वंचित घटकांसाठी भरीव निधी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देवेंद्र फडणवीस सरकारच्या यंदाच्या अर्थसंकल्पात सामाजिक न्याय आणि अनुसूचित जातींच्या विकासासाठी तब्बल ९ हजार ९४९.२२ कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी सांगितले. यापैकी २,७०० कोटी रुपये हे जिल्हा योजनेसाठी दिले आहेत. ७ हजार २३९ कोटी २२ लाख रुपये राज्यस्तरीय योजनेसाठी प्रस्तावित केेले आहेत. रमाई घरकूल योजनेसाठी ७०० कोटी रुपये, शासकीय वसतिगृहांसाठी ७१८ कोटी ५९ लाख रुपये व निवासी शाळांसाठी २०२ कोटी सरकारने दिले. विशेष सहाय्य योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार आणि इतर योजनांसाठी १ हजार ६८७.७९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमान योजनेच्या अंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील भूमिहीन आणि दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींना शासनामार्फत जमीन खरेदी करून वाटप होते. त्यानुसार ४ एकर जिरायती किंवा २ एकर बागायती जमीन एकरी ३ लाख रु. मर्यादेत खरेदी करून वाटप होते. योजनेत ५०% कर्ज व ५०% अनुदान मिळते. आता त्याची मर्यादा व अनुदानात वाढ प्रस्तावित आहे.

 

मागील घोषणा
- गेल्या अर्थसंकल्पात अनुसूचित जातीच्या कल्याणकारी याेजनांसाठी ७ हजार २३० कोटी रुपयांची तरतूद केली होती. 
यंदाच्या अर्थसंकल्पात अनुसूचित जातीच्या कल्याणकारी योजनांसाठी ९ हजार ९४९.२२ कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. 
- गेल्या अर्थसंकल्पात अनुसूचित जमातींच्या कल्याणकारी कार्यक्रमांसाठी ६ हजार ७५४ कोटींची तरतूद केली होती. 
यंदाच्या अर्थसंकल्पात अनुसूचित जमातींच्या हितार्थ योजनांसाठी ८,९६९.५ कोटींचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. 
- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळासाठी ४०० कोटींचा निधी दिला होता.   
यंदा मात्र महामंडळाला गतवर्षीच्याच ४०० कोटींची वाढीव निधीच्या अनुषंगाने तरतूद केल्याचे सांगितले आहे. 


नवीन योजना
अनुसूचित जाती आणि नवबौद्धांच्या वस्तीत मूलभूत सोयी सुविधांसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना ही नवीन योजना.
ही नवीन योजना सन २०१८-१९ पासून राज्यभरात राबवण्याचा संकल्प राज्य सरकारकडून करण्यात आला आहे.


यासाठीही तरतूद
- मानव विकास निर्देशांक वाढीस २७ तालुक्यांसाठी ३०५ कोटींची तरतूद केली.  
- अखिल भारतीय मराठी साहित्य व नाट्य संमेलनास आता २५ लाखांएेवजी ५० लाखांचा वाढीव निधी.


पुढील स्‍लाइडवर पाहा, सर्वांना खूश करण्याचा प्रयत्न... 

बातम्या आणखी आहेत...