आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई: धनगर अारक्षणाच्या ढाेलाने अाझाद मैदान दुमदुमले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - धनगर समाजाचा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश तसेच अारक्षण देण्याच्या मागणीसाठी मंगळवारी हजाराे धनगर बांधवांनी ढाेल गर्जना करून राज्य सरकारच्या विराेधात संताप व्यक्त केला. कपाळाला भंडारा, डाेक्याला पिवळ्या, भगव्या रंगाचे फेटे, खांद्यावर घाेंगडी, कमरेला धाेतर अशा पारंपरिक वेशात राज्याच्या सातारा, सांगली, उस्मानाबाद, पुणे, अहमदनगर अादी विविध भागांतील हजाराे धनगर बांधव दुपारी अाझाद मैदानात एकवटले. अांदाेलनात वयाेवृद्धांसह अाबालवृद्धही सहभागी झाले हाेते.  


 केंद्र सरकारच्या महाराष्ट्रातील एसटी यादीत यापूर्वीच समावेश झालेला असताना धनगरएेवजी धनगड असा वाद निर्माण केल्याने समाजाला सवलतींपासून वंचित ठेवण्यात आले. यामुळे धनगरांच्या चार पिढ्या उद्ध्वस्त झाल्याचा अाराेप मोर्चाचे नेतृत्व करणारे अामदार शेंडगे यांनी केला.  या ढाेल गर्जना अावाजाने सरकार जागे न झाल्यास २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप सरकारला त्यांची जागा दाखवण्याचे काम धनगर समाजाकडून करण्यात येईल, असा इशाराही या वेळी देण्यात आला.  

 

बातम्या आणखी आहेत...